स्त्रीच्या सौंदर्यात केसांचे स्थान महत्त्वाचे असते. परंतु, आजकाल केसगळती ही अनेक स्त्रियांमध्ये सामान्यपणे आढळून येणारी समस्या आहे. मोनोपॉजमध्ये ही समस्या अधिकच गंभीर होते. त्यासाठी आहारात या '५' पोषकघटकांचा समावेश केल्यास मोनोपॉजमध्ये होणाऱ्या केसगळतीला आला बसतो. 
१. प्रोटिन्स:
प्रोटीन हा आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आहारात कमीत कमी १०-१५ % प्रोटीन असणे आवश्यक आहे. जर आहारात अपुऱ्या प्रमाणात प्रोटीन असल्यास केस कमकुवत होतात. आठवड्यातून २-३ अंडी खाणे केसांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२. कार्बोहायड्रेट्स:
अनेक महिला वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात आणि प्रोटिन्स अधिक प्रमाणात घेतात. परंतु, प्रोसेस फूडमध्ये असलेलय कार्बोहायड्रेट्समुळे केस खराब होतात आणि गळू लागतात. म्हणून कमी कॉम्प्लेक्स कार्ब्स युक्त आहार घ्या. 


३. व्हिटॅमिन सी:


केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी हे पोषकघटक देखील गरजेचे आहे. त्यासाठी आहारात डाळी, काळीमिरी, कडधान्य, पालक, ब्रोकोली, स्ट्राबेरी, किवी सारखी फळे घ्या. 


४. व्हिटॅमिन ए :
केस कमकुवत होण्याला आळा घालण्यासाठी व्हिटॅमिन ए फायदेशीर आहे. पालक, गाजर, रताळी यांसारखे पदार्थ व्हिटॅमिन ए चा उत्तम स्त्रोत आहे. 


५. फॅट्स: 
फॅट्स मधून मिळणारे अॅसिडस आणि फॅटी अॅसिड हे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. या घटकांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत आणि डिहायड्रेट होतात. म्हणून आहारात अळशी, अक्रोड, चिकन, अंडी आणि ऑलिव्ह ऑईलचा समावेश करा.