मुंबई : उन्हाळा सुरु होताच आपण फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. पण उन्हाळ्यात येणारा घाम ही मोठी समस्या असते. त्यामुळे बाहेरच काय पण ऑफिसपर्यंतचा प्रवासही नकोसा होतो. घाम, चिकचिक दूर करुन उन्हाळ्यातही फ्रेश लूक मिळवण्यासाठी ब्युटी बॅगमध्ये या गोष्टी अवश्य कॅरी करा. पहा कोणत्या आहेत त्या टिप्स...


फेस वाईप्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे सतत घाम येणे. त्यामुळे चेहरा चकचकीत होतो. डल दिसू लागतो. इतकंच नाही तर मेकअपही खराब होतो. पण यामुळे त्रासून जाण्याची गरज नाही. फक्त सोबत फेस वाईप्स किंवा छोटा नॅपकिन ठेवा. त्यामुळे तुम्ही गरज असेल तेव्हा चेहरा स्वच्छ करु शकता.


ड्राय शॅम्पू


केसातील तेल, धूळ, घाम साफ करण्यासाठी ड्राय शॅम्पू उपयुक्त ठरतो. हा शॅम्पू  सलोनमध्ये उपलब्ध असेल.


सीसी क्रिम


सीसी क्रिम चेहऱ्यावर छान चमक आणते. त्यामुळे बाहेर जाताना तुम्ही याचा अवश्य वापर करा.


वॉटरप्रुफ काजळ


घामामुळे काजळ पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा लूक बिघडू शकतो. काजळामुळे छान प्रेजेंटेबल लूक मिळतो. त्यामुळे वॉटरप्रुफ काजळ नेहमी सोबत ठेवा.


परफ्यूम


उन्हाळ्यात येणारा घाम परफ्यूम जास्त वेळ टिकू देत नाही. म्हणून बाहेर जाताना परफ्यूम अवश्य कॅरी करा. म्हणजे आवश्यक असेल तेव्हा फ्रेशनेससाठी तुम्ही परफ्यूम वापरू शकता.