मुंबई : प्रत्येक नात्यात काहीतरी तडजोडी, अॅडजस्टमेंट कराव्या लागतात. मात्र या तडजोडी दोन्हीकडून असाव्यात. अॅडजस्टमेंट फक्त एकाकडून होत राहिल्यास ते नाते हेल्दी राहत नाही. फक्त एकतर्फी होते. प्रेमातही तडजोड करावीच लागते. पण यासाठी तुम्ही कितपत आणि काय काय अॅडजस्ट करणार हे स्वतः ठरवायला हवे. गरजेपेक्षा अधिक समजून घेणे, अॅडजस्ट करणे तुम्हालाच त्रासदायक ठरू शकते. म्हणून पार्टनरवर कितीही प्रेम असले तरी या नात्यात या गोष्टीत कधीही तडजोड करु नका...


स्वप्नांसोबत कधीच करु नका तडजोड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमची काही स्वप्नं असतील तर ती नक्की पूर्ण करा. पार्टनर याबाबतीत काही तडजोड करायला सांगत असल्यास किंवा लावत असल्यास भावनेच्या आहारी जावून तुमच्या स्वप्नांची आहुती देऊ नका. कदाचित काही कारणास्तव तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करता आले नाही तरी तुम्ही त्यासाठी प्रयत्न केल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.


मित्रांच्या बाबतीत अॅडजस्टमेंट


प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास फ्रेंड्स असतात. त्यांच्यासोबत विशिष्ट बॉन्डिंग असते. पार्टनरचे आयुष्यातील स्थान कोणीच घेऊ शकत नाही. मात्र त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची आहुती देऊ नका. गरजेच्या वेळी मित्रमंडळीच कामी येतात.


नोकरी सोडणे


नोकरी सोडण्यासाठी पार्टनर जबरदस्ती करत असेल तर नोकरी सोडण्याची चूक करु नका. भावनेच्या आहारी जावून नाते टिकवण्याच्या उद्देशाने हा भयंकर निर्णय घेऊ नका. जर तुमची नोकरी चांगली असेल, तुम्हाला त्यातून आनंद मिळत असेल तर अशी चूक अजिबात करु नका.


प्रत्येक गोष्टीत आपलेही मत द्या


पार्टनरवर कितीही प्रेम, विश्वास असला म्हणजे असे नाही की तुम्ही तुमची मते दडपून टाकावी, त्याबद्दल काहीच बोलू नये. कोणतेही नाते हे दोघांचे असते. त्यात दोघांची मते, निर्णय महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे याबाबतीत समानता बाळगावी.


लूक बदलण्यास सांगणे


तुम्हाला जसे राहणे योग्य वाटते, आवडते तसे राहणे काही चूकीचे नाही. पण वारंवार तुमच्या लूकवरून बोलणाऱ्या पार्टनरला वेळीच उत्तर द्या. तुम्ही तुमच्या पर्सनालिटीवर खूश असाल तर कोणासाठीही स्वतःला बदलू नका.