मुंबई: लग्नापूर्वी असलेले पार्टनरसोबतचे संबंध लग्नानंतर पूर्णपणे बदलतात. ते संबंध पूर्वीप्रमाणेच प्रेमळ नक्की असतात. पण, तरीही काही गोष्टींचे भान हे नक्की बाळगले पाहिजे. खास करून काही गोष्टी शेअर करण्याबाबाबत. काही गोष्टी अशा असतात की, त्या पार्टनरसोबत शेअर केल्याने तुमच्या नात्यात अंतरही येऊ शकते. जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या पार्टनरसोबत शक्यतो शेअर करू नयेत.


लग्नाचा खर्च


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न किंवा लग्नानंतर रिसेप्शनला आलेला खर्च याबाबत पार्टनरसोबत चुकूनही बोलू नका. या खर्चावरून पार्टनरसोबत बढाया मारल्याने तुमच्या नात्यात अंतर पडू शकते.


नातेवाईकांची खिल्ली उडवणे


कधी कधी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पार्टनरसोबत बोलताना नातेवाईकांची खिल्ली उडवली जाते. पण, असे करणे धोकादायक आहे. कारण, पार्टनरचे त्या व्यक्तीसोबत संबंध चांगले, जवळचे असू शकतात. त्यामुळे पार्टनर दुखावण्याची भीती असते.


एक्स बरोबर तुलना


तुमचा एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड यांच्यासोबत तुमच्या विद्यमान पार्टनरची तुलना अजिबात करू नका. असे केल्याने कारणाशिवाय आपण आपल्या वैवाहिक जीवनात वादाचे बीज पेरून ठेवता..


पार्टनरला अॅटीट्यूड दाखवू नका


तुमचे नाते जर घट्ट बनवायचे असेल तर, पार्टनरला अॅटीट्यूड दाखवण्यापासून दूर राहा. पार्टरला हे कधीही दाखवायचा प्रयत्न करू नका तुम्ही त्याच्यापेक्षा वरचढ आहे ते सांगायचे, शब्दातून दाखवायचे प्रयत्न करू नका.


नोकरी किंवा कामावरून राग


पार्टनरसोबत त्याच्या कामवरून, किंवा नोकरीवरून रागावू नका. त्याला नेहमी प्रोत्साहन द्या. मग त्याचा जॉब कसा का असेना.