लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!
ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे.
ठाणे : दक्षिण आफ्रिकेमदध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने संपूर्ण जगातील शास्त्रज्ज्ञांचं टेन्शन वाढलं आहे. भारत सरकारनेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. तर ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, 90 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.
यामध्ये तब्ब्ल 90.46% ठाणेकरांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मात्र लस घेतल्यावरही 7 टक्के ठाणेकरांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या नाहीत. माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीत अँटीबॉडीजचं प्रमाण सर्वात कमी आहे. याचप्रमाणे उथळसर भागात सर्वाधिक अँटीबॉडीज आहेत. झोपडपट्टीच्या तुलनेत इमारतींमधील नागरिकांत अधिक अँटीबॉडीज आढळून आल्याची नोंद आहे.
या अहवालात नमूद केल्याप्रमाणे,
इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये 93.32 टक्के अँटीबॉडीज आढळल्या
झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये 88.12 टक्के आढळल्या अँटीबॉडीज
स्त्रियांमध्ये 91.11 टक्के अँटीबॉडीज तर पुरुषांमध्ये 89.61 टक्के अँटीबॉडीज
6 ते 17 वयोगटात 83.43 टक्के अँटीबॉडीज आढळल्या
नव्या व्हेरिएंटबाबत WHO काय म्हणतं?
हा व्हेरिएंट अधिक म्यूटेशन झालेला आहे. ज्यामुळे चिंता वाढू शकते.
या व्हेरिएंटमुळे संक्रमणात वाढ होऊ शकते.
दक्षिण आफ्रिकेत जवळपास सगळ्या प्रांतात या व्हेरिएंचटी प्रकरणं वाढतायत.
अस्तित्वात असलेल्या कोरोना (SARS-CoV-2) च्या चाचणीच्या पद्धतीद्वारे हा व्हेरिएंट शोधला जाऊ शकतो.