मुंबई : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि बदलत्या जीवनशैलीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. थकवा, तणाव, नैराश्य इत्यादी गोष्टींभोवती माणसाचं आयुष्य फिरत आहे. या सगळ्या कारणांमुळे हृदयरोग होण्याची दाट शक्यता असते. हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी अत्यंत काळजी घेण्याची गरज असते. सलग एका जागी बसून काम करत असाल तर, दर २० मिनिटांनंतर ब्रेक घेण्याची आवश्यकता असते.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगणकावर काम करणाऱ्या ह्रदयरोगींनी दर २० मिनिटांनी कामातून सात मिनिटांचा ब्रेक घेणं फार गरजेचं आहे. यादरम्यान त्यांनी चालणे किंवा हातपाय हलविल्यासारख्या काही हलक्याफुलक्या शारीरिक हालचाली करायला हव्यात. जे लोक सुट्टी घेतात त्यांच्यात हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते, 


पूर्वीच्या अध्ययनातून दीर्घकाळपर्यंत बसून राहिल्यामुळे जीवनकाळ छोटा होऊ शकतो, मात्र कामातून अधूनमधून ब्रेक घेतल्याने हा धोका कमी होऊ शकतो, असे समोर आले होते. कामात ब्रेक घेतल्याने दररोज सुमारे ७७० किलो कॅलरी ऊर्जा कमी केली जाऊ शकते.