वॉशिग्टन : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी पार्कमध्ये खेळायला गेलेल्या मुलासोबत अशी घटना घडली की काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. हे मूल स्प्लॅश पॅडमुळे मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संपर्कात आलं होतं. अमीबा मुलाच्या मेंदूमध्ये नाक किंवा तोंडातून प्रवेश केला असल्याची शक्यता आहे. ज्यामुळे 6 दिवसात त्याचा मृत्यू झाला.


का आहे इतका धोकादायक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक उद्यानांमध्ये स्प्रिंकलर, कारंजे, नोजल आणि स्प्लॅश पॅडवरील इतर पाण्याचे स्प्रे वेळेवर साफ न केल्याने, मेंदू खाणारे अमीबा त्यावर जमा होतात. जर हा अमीबा नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करत असेल तर ते घातक ठरू शकतं. माहितीनुसार, मेंदूला खाणाऱ्या या अमीबाचा संसर्ग झालेल्या 95 टक्के लोकांचा मृत्यू होतो.


आर्क्सिंग्टनच्या टेक्सास शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शहर आणि टेरंट काउंटी सार्वजनिक आरोग्य यांना 5 सप्टेंबर रोजी सूचित करण्यात आलं होतं की अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


घाणीमध्ये होते या अमीबाची वाढ


मुलाच्या आजाराची माहिती मिळताच आरोग्य अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. दरम्यान, आर्लिंग्टनमधील सर्व सार्वजनिक स्प्लॅश पॅड बंद करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी स्प्लॅश पॅडच्या पाण्यात अमीबाचं अस्तित्व असल्याचं सांगितलं होतं. डेप्युटी सिटी मॅनेजर लेमुएल रँडॉल्फ म्हणाले, "स्प्लॅश पॅडच्या नियमित साफसफाईचा अभाव होता.