वेदनारहित गाठ असू शकते Breast Cancer चं लक्षण, महिलांनी `या` चाचण्या करून घेणं आवश्यक
Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक असणे आणि नियमित तपासणी चाचण्या केल्याने लवकर निदानात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.
Breast Cancer : स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान होणं खूप महत्वाचे असते. कारण त्याने रोगनिदान आणि उपलब्ध उपचार पर्यायांच्या श्रेणीत लक्षणीय सुधारणा करता येते. स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक असणे आणि नियमित तपासणी चाचण्या केल्याने लवकर निदानात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.
मुंबईतील डॉ. अजय शहा यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीची सामान्य चिन्हे आणि लक्षणे सांगितली आहेत.
स्तनातील गाठ
सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ असणे. ही गाठ वेदनारहित, टणक आणि त्याला बेढब कडा असू शकतात
स्तनातील वेदना किंवा अस्वस्थपणा
काही महिलांना स्तनामध्ये वेदना किंवा अस्वस्थपणा जाणवतो, जी स्थानिक किंवा सामान्य वाटू शकते
स्तनाचा आकार बदलणे
एका किंवा दोनही स्तनांच्या आकारात किंवा दिसण्यात लक्षणीय बदल हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
त्वचेच्या रंगात बदल होणं
स्तनावरील त्वचेच्या रंगात बदल, जसे की लालपणा, मलूलपणा किंवा सुरकुतणे गंभीरतेने घेणे महत्वाचे आहे.
स्तनाग्रातील बदल
स्तनाग्रातील बदल जसे इन्व्हर्टेड निपल, रक्तस्त्राव होणे किंवा त्यावरील खवले हे समस्येचे लक्षण असू शकते.
स्तनावरील सूज
स्तनावरील सुज, उबदारपणा किंवा लालसरपणा चिंतेचे कारण असू शकते.
लिम्फ नोड्स वाढणे
काखेत किंवा कॉलरबोनभोवती वाढलेले लिम्फ नोड्स स्तनाच्या कर्करोगचे लक्षण आहे.
ही लक्षणे किंवा चिन्हे स्तनाचा कर्करोगा शिवाय इतर रोगांची लक्षणे असू शकतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत पोचण्याची घाई करू नये. तरीदेखील ही लक्षणे सातत्याने राहिल्यास किंवा असामान्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे.
लक्षणे आणि चिन्हाबाबत जागरूक राहण्याबरोबरच लवकर निदान होण्यासाठी स्तनाच्या कर्क रोगाच्या चाचण्या करणे महत्वाचे आहे.
मॅमोग्राफी
स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे स्क्रीनिंग साधन आहे.
क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी
गाठी किंवा बदल तपासण्यासाठी डॉक्टर स्तनाची शारीरिक तपासणी करतात.
स्तनांचे स्वयं-परीक्षण
स्तनांचे स्वयं-परीक्षण हे एकमेव साधन नसले तरी त्यामुळे व्यक्तीला शरीराशी परिचित होण्यास आणि त्यातील बदल समजून घेण्यास मदत होते.
स्तनांचा एमआरआय
स्तनाच्या कर्करोगाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो, कारण त्यामध्ये स्तनाच्या टिश्यूजचे अधिक स्पष्ट चित्र दिसते.
अनुवांशिक चाचणी
कुटुंबात कुणाला स्तनाचा कर्करोग झाला असल्यास अनुवांशिक चाचणी मध्ये BRCA1 आणि BRCA2 जनुकांमधील आनुवंशिक बदल समजतात जे स्तनाच्या कर्करगा धोका वाढवतात.
सुचविलेल्या चाचणी पद्धती आणि त्या किती वेळा करायच्या हे वैयक्तिक वैद्यकीय इतिहास आणि धोके यावर अवलंबून असते याची नोंद घेणे महत्वाचे आहे. महिलांनी त्यांच्या डॉक्टरांबरोबर तपासणी पर्याय आणि वेळापत्रकांवर चर्चा केली पाहिजे जेणेकरून त्यांच्या परिस्थितीसाठी सर्वोत्तम काय आहे हे नक्की करता येईल.
स्वयं-चाचणी आणि नियमित तपासणीच्या माध्यमातून लवकर समजल्याने यशस्वी उपचारांची शक्यता वाढते. जेव्हा स्तनाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येतो तेव्हा उपचार साधारणतः कमी तीव्रतेचे असतात आणि रोगनिदान अधिक अनुकूल होते