Acidity Problem Solution: या गोष्टी तुम्हाला ठेवतील Acidityपासून कोसो दूर
अॅसिडिटी इतर अनेक आजारांना मात्र निमंत्रण देते.
मुंबई : आजकाल अनेकांना अॅसिडिटीचा त्रास असतो. अॅसिडिटी हा एक आजार नाही, परंतु अॅसिडिटी इतर अनेक आजारांना मात्र निमंत्रण देते. पोट फुगणे, पोटात जळजळ होणं, पोटदुखी, अस्वस्थता, मळमळ येणं ही अॅसिडिटीची सामान्य लक्षणं आहेत. यासाठी वेळेवर न खाणं, तणाव किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात खाणं, धूम्रपान, चुकीचा या गोष्टी कारणीभूत आहेत. या सर्व गोष्टींना तुम्हीच जबाबदार आहात.
जर आपण अॅसिडीटीवर योग्य वेळी त्यावर उपचार केले नाहीत तर ते गंभीर स्वरुपाचं रूप धारण करू शकतात. योग्य जीवनशैली आणि आहारात साधे बदल करून तुम्ही सहजरित्या या समस्येवर मात करू शकता. तर अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचा अवलंब केल्याने अॅसिडिटीवर मात करणं सहज शक्य आहे.
तणावमुक्त रहा
अॅसिडीटी आणि तणाव यांचा संबंध? होय, हे ऐकून आपल्याला नक्कीच विचित्र वाटत असेल. परंतु तणाव आपलं वजन वाढवतंच परंतु यामुळे अॅसिडिटीची समस्या देखील उद्भवते. आपल्याला अॅसिडिटीपासून दूर रहायचं असेल तर ताणतणाव घेऊ नका. एका अभ्यासानुसार अॅसिडिटीचा ताणतणावाशी जवळचा संबंध आहे. सततचा ताणतणाव अॅसिडीटीला कारणीभूत ठरतो. ज्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
वेळेवर जेवण करा
अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी वेळेवर जेवलं पाहिजे. उशिरा आहार घेणं टाळावं. कारण जेव्हा तुम्ही उशीरा जेवता किंवा बराच वेळ उपाशी राहता तेव्हा गैस्ट्रिक रस आणि पोटात जळजळ होऊ शकते. यानंतर, तुम्ही ताबडतोब जेवण केलं तर मग अन्न पचन होण्यास अडथळा येऊ शकतो. अशा परिस्थितीत अॅसिडीटी टाळण्यासाठी वेळेवर जेवणं गरजेचं आहे.
खाणं आणि झोपण्यामध्ये अंतर ठेवा
अॅसिडिटीला प्रतिबंध करण्यासाठी रात्रीचं जेवण आणि झोपेच्या दरम्यान पुरेसं अंतर असलं पाहिजे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आपण कमीतकमी 2 ते 3 तास खाणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जेवणानंतर थोडावेळ चालणंही आवश्यक आहे. बर्याचदा लोकं खाल्ल्यानंतर सरळ अंथरुणावर पडतात, ज्यामुळे आम्लपित्त तयार होणं सामान्य गोष्ट आहे. यामुळे आपल्याला सकाळी अस्वस्थता येऊ शकते आणि पोटात जळजळ होण्याची समस्या देखील बळावू शकते.
पुरेशी झोप घ्या
रात्री चांगली झोप देखील गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या टाळण्यास महत्वाची भूमिका बजावते. एका अहवालानुसार, जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराचे अवयव विषारी पदार्थ स्वच्छ करण्याचं काम करतात. जेणेकरून जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला फ्रेश जाणवतं. म्हणून, पुरेशी झोप अॅसिडिटीच्या समस्येपासून केवळ दूर ठेवत नाही तर थकवा आणि तणाव देखील दूर करते.
अधिक कॅलरीचं सेवन करणं टाळा
अॅसिडिटीपासून मुक्त होण्यासाठी आपल्या आहारात कॅलरीज कमी ठेवा. जास्त कॅलरी घेतल्याने अस्वस्थता आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. म्हणूनच, आपल्या आहारात कॅलरींच्या प्रमाणात विशेष लक्ष द्या.