Superbugs : कोरोनानंतर आता सुपरबगमुळे मृत्यूचं तांडव होणार; शरीर संबंधातून होतोय संसर्ग
दरवर्षी एक कोटी लोक सुपरबगमुळे जीव गमावतील अशी भीती मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या अहवालात वर्तवण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या सुपरबगवर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही.
Superbugs : सर्वत्र कोरोना(corona)ने थैमान घातलेलं असतानाच आता आणखी एक धोका जगावर घोंगावत आहे. सुपरबगमुळे(Superbugs) मृत्यूचं तांडव होण्याची भीती आहे. दरवर्षी एक कोटी लोक सुपरबगमुळे जीव गमावतील अशी भीती मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या अहवालात वर्तवण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या सुपरबगवर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. अँटिबायोटिक्स किंवा औषधांच्या अतिवापरामुळे सुपरबग तयार होत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
सुपरबग संसर्ग इतरांना होण्याचीही शक्यता असते. सध्या या सुपरबगमुळे दरवर्षी सरासरी 13 लाख लोकांचा मृत्यू होतोय. तेव्हा औषधांचा अतिवापर करत असाल तर वेळीच सावधान व्हा अशा इशारा वैज्ञकीय तज्ञांकडून देण्यात आला आहे.
सुपरबग काय आहे?
सुपरबग हा जीवाणू, विषाणू, पॅरासाईटचा एक स्ट्रेन आहे. अँटिबायोटिकच्या गैरवापर तसेच याच्या अतीवापरामुळे सुपरबग तयार होतो. सुपरबग बनल्यानंतर याचा संसर्ग कोणत्याही औषधांनी मरत नाही. जखम, लाळ, लैंगिक संबंध, त्वचेच्या संपर्कातून सुपरबग पसरतो. सुपरबग इतर रोगांपेक्षा लोकांमध्ये वेगाने पसरत असल्याचे चिंता वाढली आहे.
चीनमध्ये शवागारात एका दिवसात 10 हजार मृतदेह
गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातलाय. परिस्थिती इतकी बिघडलीय की इथं अक्षरश: मृत्यूचं तांडव सुरू झालंय. एकीकडे रूग्णालयात पाय ठेवायला जागा नाही तर दुसरीकडे स्मशानभूमीतही जागा अपुरी पडू लागलीय. शांघायच्या शवागारात एका दिवसात तब्बल दहा हजारांहून अधिक मृतदेह पोहचले. या शवागाराचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
चीनमधील मेनलँड द पेपरच्या वृत्तानुसार नवीन संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्यानं आपात्कालीन वॉर्डमधील रूग्णांची संख्या दुप्पट झालीय. कोरोना संक्रमित 80 % रूग्णांपैकी 40 ते 50 % रूग्ण वृद्ध आहेत. हायपोक्सिमिया, छातीत जडपणा आणि श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या गंभीर रुग्णांचा देखील यात समावेश आहे.
नुकतंच शांघाय मधील एका हॉस्पिटलनं शहरातील 25 दशलक्ष लोकांपैकी निम्म्या लोकांना विषाणूची लागण होईल असा अंदाज वर्तवलाय. चीनमध्ये कोरोनाची दहशत इतकी वाढलीय की, याचाच धसका घेऊन एका तरूणानं इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चीनमधील सामाजिक कार्यकर्ते जेनिफर जेंग यांनी सोशल मीडियात हा व्हिडिओ शेअर केलाय. जिनपिंग सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे चीनमध्ये हाहाकार माजलाय. कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही तर चीनच्या चुकीची जगाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.