मुंबई : अरे यार आज भारीच झोप येतेय..., भात खाल्लाय; भात खाल्ला ना, आता झोप आलीच म्हणून समजा... अरेरे भात खायलाच नको... असं तुम्ही एकदातरी म्हटलंच असेल. ऑफिसला गेलं असता काहीतरी वेगळं खायचं म्हणून जर तुम्ही भाताचा एखादा पदार्थ नेला तर तो खाल्ल्यानंतर, पेंग आली म्हणून समजा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भात खाल्ल्यावर आम्हाला झोप येत नाही, सुस्तावल्यासारखं वाटत नाही असं म्हणणारे फार क्वचित. 


झोप का येते ? 
भात खाल्ल्यानंतर त्यातील कार्बोदकांचं (Carbs) रुपांतर हे ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोजच्या पचन प्रक्रियेसाठी इन्सुलिनची मदत लागते. पण याचं प्रमाण वाढल्यास मेंदूतील ट्रिप्टोफेनचं रुपांतर फॅटी अॅसिडमध्ये होण्यास उत्तेजन मिळण्यात परावर्तित होतं. 


सदर प्रक्रिया मेटालोनिन आणि सेरोटोनीनचं प्रमाण वाढतं आणि थोडक्यात आपल्याला झोप येते. 


ही झोप थांबवायची कशी? 
- भात प्रेमींना भात तर खायचा असतो, पण त्यांना ही झोप मात्र नको असते. त्यामुळं अशा मंडळींनी भात खाण्याचं प्रमाण कमी करावं. त्याऐवजी किनोआ, लापसी, मल्टीग्रेन भाकरी अशा पदार्थांना प्राधान्य द्यावं. 
- ब्राऊन राईस हा भातासाठी एक उत्तम पर्याय. शेंगदाण्याप्रमाणं हलकी चव असणारा हा भाताचाच आणखी एक उपयुक्त पर्याय. 
- भात खाल्ल्यानंतर बडिशेप व्यवस्थित चावून खाल्ल्यानं त्याचंही पचन सुयोग्य पद्धतीनं होतं.
- भात खाल्ल्यानंतर लगेचच गोडाचा पदार्थ खाऊन झोप बळावण्यापेक्षा त्याऐवजी ग्रीन टी प्यावा, यामुळं पचन प्रक्रियेला चांगली गती मिळते. 


फार सोपे आणि सहज असेच हे उपाय वापरात आणून बघा तुमची झोप कमी होते का... 



(वरील माहिती सर्वसामान्य अनुभव आणि संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )