Alert for drinkers: लिव्हर! शरीरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. लिव्हर ज्याला मराठीत यकृत म्हणतात यामुळेच आपल्या शरीरात विविध महत्त्वपूर्ण कामं होत असतात. तुमच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी तुमचं यकृत सुधृढ असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पित्ताची निर्मिती करणे, काही विशिष्ट पद्धतीचे व्हिटॅमिन्स आणि ग्लुकोज साठवून ठेवण्याचं महत्त्वाचं काम यकृतामार्फत केलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचं लिव्हर खराब होण्याची विविध करणं आहेत. यामध्ये तुमची चुकीची जीवनशैली, यासोबत एक मुख्य कारण म्हणजे मद्याचं सेवन करणे हे आहे. जेंव्हा मद्याच्या सेवनाने लिव्हर खराब होतं, तेंव्हा त्याला मद्यसंबंधी लिव्हरचा आजार बोललं जातं.  


काय असतात सुरुवातीची लक्षणं 


लिव्हर हे शरीरातील विषारी पदार्थाना शरीराबाहेर काढण्याचं काम करतं. जेंव्हा तुम्ही दारूचं सेवन करतात, तेंव्हा लिव्हरमधून वेगवेगळे एन्झाइम्स बाहेर पडण्यास सुरुवात होते. ज्याने तुमच्या शरीरातील अल्कोहोल शरीराबाहेर निघण्यास सुरुवात होते. तुम्ही तुमच्या लिव्हरच्या क्षमतेपेक्षा जास्त मद्यसेवन केल्यास तुमचं लिव्हर खराब होण्यास सुरुवात होते. जास्त मद्य सेवनाने तुमच्या लिव्हरमध्ये फॅट्स वाढण्यास सुरुवात होते. जास्त मद्यसेवनाने तुमच्या लिव्हरवरील चांगल्या पेशी कमी होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, म्हणून तुम्हाला तुमचं लिव्हर किती खराब झालं आहे हे समजत नाही. 


दारूमुळे लिव्हर खराब होत असेल तर काय लक्षणं दिसतील ? 


लिव्हरला सूज येऊ शकते, ज्याने पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं, थकवा, अचानक वजन कमी होणं, भूक कमी होणं, उलट्या यासारखी लक्षणं दिसतात. 


जास्त दारू पिण्याने लिव्हरवर काय परिणाम होतो, जबाबतही माहिती जाणून घेऊयात. 


अल्कोहोलिक फॅटी लिव्हर 


जास्त मद्यसेवनाने लिव्हरवर मोठ्या प्रमाणात फॅट्स जमतात. जास्त फॅट्स जमल्याने लिव्हरमधील एन्झाइम्स या फॅट्सला तोडून शरीराबाहेर ढकलण्यास असमर्थ ठरतात. जास्त प्रमाणातील मध्यसेवनाने फॅटी लिव्हरची समस्या अनेकांना जाणवते. काही दिवस दारू बंद केल्यास या समस्येपासून तुमची सुटका होऊ शकते. तुमचं लिव्हर किती खराब झालं आहे यावर तुमच्या लिव्हरची रिकव्हरी अवलंबून आहे. 


अल्कोहोलिक हॅपिटायटिस 


तुम्ही वारंवार जास्त दारूचं सेवन करत असाल तर तुम्ही अल्कोहोलिक हॅपिटायटिसचे शिकार होऊ शकतो. जास्त दारू पिण्याने तुमच्या लिव्हरला सूज येते. यामुळे तुम्हाला लिव्हरच्या आसपास सूज येणं, थकवा येणं, जेवण कमी होणं, ताप, उलट्या यासारखी लक्षणं पाहायला मिळू शकतात. अल्कोहोलिक हॅपिटायटिसची लक्षणं गंभीर आणि मध्यम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकतात. अल्कोहोलिक हॅपिटायटिसपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला दारू पूर्ण बंद कारवी लागेल. याची ट्रीटमेंट घेताना तुम्हाला पथ्य पाळणं गरजेचं आहे, अनेकदा अशा केसेसमध्ये तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट देखील करावं लागू शकतं 


अल्कोहोलिक सिरॉसिस 


दारूचं सातत्याने सेवन केल्याने तुम्हाला हा त्रास सहन करावा लागू शकतो. याने तुमच्या लिव्हरवरील पेशी खराब होतात. याला फायब्रोसिस देखील म्हणतात. फायब्रोसिस वाढल्याने अल्कोहोल सिरॉसिस होण्याची शक्यता असते. याने तुमच्या लिव्हरमधील ब्लड प्रेशर वाढणं, पोटात पाण्यासारखा तरल पदार्थ जमा होणं, रक्तातील विषारी पदार्थ जमा होत राहणं आणि यामुळे थेट मेंदूवर परिणाम होऊ शकतो. जास्त इन्फेक्शन वाढण्याने किडनी फेल आणि लिव्हर कॅन्सरचा धोका असतो.