मुंबई : कोरोनाचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. काही देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवातही झाली आहे. अमेरिका देखील त्या देशांमधील एक देश आहे ज्या ठिकाणी या धोकादायक व्हायरसने थैमान घातलं आहे. अमेरिकेत या व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर आता कोरोनापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने कमकुवत रोग प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस मंजूर करण्यात आला आहे. 


या लोकांना देण्यात येणार बूस्टर डोज


संसर्गजन्य रोगांवरील अमेरिकेचे अव्वल तज्ज्ञ डॉ एंथनी फाउची यांनी म्हटलं आहे की, सध्या हा बूस्टर डोस केवळ कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी उपलब्ध असेल. परंतु लवकरच अशी वेळ येईल जेव्हा प्रत्येकाला त्याची आवश्यकता असेल.


USFDAने दिली परवानगी


फाइजर-बायोएनटेक आणि मॉडर्ना लसीच्या तिसऱ्या डोसाला USFDAने आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. एफडीए आयुक्त जेनेट वूडकॉक यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "कोरोनाची आणखी एक लाट देशात दाखल झाली आहे. एफडीए चिंतेत आहे कारण कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना या धोकादायक रोगाचा जास्त धोका आहे."


यूएसएफडीएच्या मते, कोरोना लसीचा बूस्टर डोस कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती किंवा अवयव प्रत्यारोपण असलेल्या लोकांसाठी आहे.