मुंबई : लिपस्टिक लावणे कोणत्या मुलीला आवडत नाही. अशी मुलगी असणे दुर्मिळच. प्रत्येक महिलेच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लिपस्टिकशिवाय मेकअप अधुरा वाटतो. तर अनेकदा फक्त लिपस्टिक लावल्याने सौंदर्यात भर पडते. पण लिपस्टिक लावण्याचे इतर फायदे तुम्हाला माहित आहेत का?


युव्ही किरणांपासून बचाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओठांचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिकमुळे सुर्याच्या युव्ही किरणांपासून ओठांचे संरक्षण होते.


आत्मविश्वास वाढतो


अलिकडेच झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, लिपस्टिक लावल्याने महिलांना अधिक कॉन्फिडेंट वाटते. त्याचबरोबर लिपस्टिक लावणाऱ्या महिला तुलनेने अधिक आत्मविश्वासू असतात.


मूड चांगला होतो


मानसशास्त्रानुसार, लिपस्टिकचा परिणाम महिलांच्या मूडवर होतो. लिपस्टिक लावल्याने महिलांचा मूड सुधारतो. लिपस्टिक महिलांसाठी उत्तम मूड लिफ्टर आहे.