शिमला मिरची आवडत नाही? आत्ताच खायला सुरुवात करा, फायदे वाचून व्हाल थक्क!
Capsicum Benefits In Marathi: शिमला मिरची खायला कंटाळा करता? पण शिमला मिरचीची आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Benefits Of Capsicum: चायनीज, पास्ता असो किंवा अस्सल महाराष्ट्रीयन व पंजाबी डिश असोत या सगळ्या पदार्थांमध्ये हमखास शिमला मिरची वापरली जाते. लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगात मिळणारी ही शिमला आरोग्यासाठीही भरपूर फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि त्याचबरोबर फायबर आणि बीटा-कॅरोटीन हे गुण असतात. शिमला मिरचीमध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीतीही नसते.
शिमला मिरची ही हमखास प्रत्येकाच्या घरात आढळते. सकाळच्या घाई-गडबडीच्यावेळेत शिमला मिरचीची भाजी झटकन होते. तसंच, पिझ्झा, पास्तामध्ये शिमला मिरची टाकून लहान मुलांना हेल्दी स्नॅक्स देतात. त्याचबरोबर गार्निशिंगसाठीदेखील शिमला मिरचीचा वापर होतो. शिमला मिरचीत व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन एसोबतच आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
शिमला मिरचीच्या बियांमध्ये सायटोकेमिकल्स आणि फ्लेव्हॉइड्स आढळतात, जे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते.
सांधेदुखीसाठी फायदेशीर
सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहात तर तुमच्या आहारात आत्ताच शिमला मिरचीचा वापर करा.
कर्करोगाचा धोका कमी होतो
शिमला मिरचीमध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात. जे अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करतात. तसंच, कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळं तुमच्या रोजच्या आहारात शिमला मिरचीचा वापर करावा.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
शिमला मिरची खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए उपलब्ध होते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. म्हणून शिमला मिरचीचे सेवन केल्यास तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहिल.
वजन कमी करण्यासाठी
शिमला मिरचीमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळं जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही शिमला मिरचीचा वापर जेवणात करु शकता. तसंच, यामुळं शरीरातील मेटाबॉलिजमदेखील सुधारते.
लाल शिमला मिरची
लाल शिमला मिरची आर्यन आणि व्हिटॅमिनचा एक चांगला स्त्रोत आहे. शिमला मिरची खाल्ल्याने शरिरातील लोहाची कमतरता भरुन काढते. एका मध्यम आकाराच्या लाल शिमला मिरचीत १६९ टक्के व्हिटॅमिन सी असते. त्यामुळं अॅनिमियासारख्या गंभीर आजारांपासून तुमचा बचाव होतो.
हाडांना बळकटी मिळते
शिमला मिरचीत मॅगनीजची मात्रा अधिक असते. मॅगनिजमुळं तुमच्या हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. तसंच, शिमला मिरचीत व्हिटॅमिन के देखील आढळते. ज्यामुळं ओस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
डिप्रेशन कमी करते
शिमला मिरचीमध्ये असलेल्या मॅग्निशियम आणि व्हिटॅमिन बी6 उपयुक्त प्रमाणात आढळतात. हे दोन्ही तत्व तुम्हाला डिप्रेशन आणि ताण-तणाव कमी करण्यास मदत करतात. मॅग्निशियम तणाव कमी करते.