Amitabh Bachchan Health Injured :  बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस. चाहत्यांसाठी ही सर्वात मोठी पर्वणी असते. आज अनेक चाहते महानायकाची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. पण तुम्हाला माहित आहे का? गेल्या वर्षी वाढदिवसाच्या दरम्यान बिग बी यांना 'प्रोजेक्ट के' दरम्यान दुखापत झाली. हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ब्लॉग पोस्टमध्ये महानायकाने याबाबत माहिती दिली. ज्या वयात सामान्य लोकं भरपूर आराम करतात. तेव्हा बिग बी अतिशय ऍक्टिवपणे काम करत आहेत. पण जेव्हाी त्यांना त्रास होतो ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात.(फोटो सौजन्य - Amitabh Bachchan Instagram 


सिनेमादरम्यान झाली दुखापत


1982 मध्ये 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फाईट सीन शूट करताना अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. हा अपघात एवढा मोठा होता की त्याचा जवळपास मृत्यू झाला. चिंतेची बाब म्हणजे दुखापत त्यावेळेस बरी झाली असली तरी त्याच्याशी संबंधित अनेक तक्रारी आजही त्याला त्रास देतात.


हेपेटायटिस-B आणि लिवर सिरोसिस 


कुलीच्या शूटिंगदरम्यान अमिताभ जखमी झाले तेव्हा अनेकांनी रक्तदान केले होते. रक्तदात्यांपैकी एकाला हिपॅटायटीस बीचा त्रास होता आणि त्याचे रक्तही अमिताभ यांच्या शरीरात गेले. त्यामुळे त्यांचे 75 टक्के यकृत खराब झाले होते.


मायस्थेनिया ग्रेविस 


हा स्नायूंशी संबंधित असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती खूप कमकुवत होतात, त्यामुळे रुग्णाला शारीरिक काम करण्यात त्रास होतो आणि ती व्यक्ती लवकर थकते. या रोगात, मज्जासंस्थेच्या पेशी आणि शरीराच्या स्नायूंमधील संवाद संपतो. 1984 मध्ये त्यांना या आजाराची माहिती मिळाली.


टीबी 


2000 मध्ये अमिताभ यांच्या पाठीच्या मणक्यातील टीबीचा उपचार झाला. असे म्हटले जाते की, त्या काळात  बिग बी "कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग करत असे. शूटिंगदरम्यान त्याला 8-10 गोळ्या खाव्या लागल्या.


डायवर्चिक्युलायटिस


हा पचनसंस्थेशी संबंधित आजार आहे. या स्थितीत, आतड्यांसंबंधी भिंतींवर तयार झालेल्या डायव्हर्टिकुला नावाच्या लहान थैल्यांना संसर्ग होतो आणि सूज येते. यामुळे 2005 मध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली.


बिग बींचा फिटनेस 


  • अमिताभ बच्चन न चुकता जिम आणि चालणे या तब्बेतीशी संबंधित गोष्टी आवर्जुन करतात. 

  • तसेच शहनशाह 9 तासांची पूर्ण झोप घेतात. दररोज प्राणायाम आणि ब्रिदींग एक्सरसाइज करतात. 

  • धूम्रपान आणि मद्यापासून अमिताभ बच्चन खूप लांब आहेत. एवढंच नव्हे तर ते गोड खाणं देखील टाळतात. 

  • संतुलित आहार हा त्यांचा फिटनेसचा मुख्य मुद्दा आहे. शुद्ध शाकाहारी जेनण आणि बॅलेन्स डाएट फॉलो करत तब्बेतीची काळजी घेतात.