मुंबई : लैंगिक संक्रमित संसर्ग कमी करण्यासाठी अनसेफ सेक्सनंतर डॉक्सीसाइक्लिनचा वापर केला जाऊ शकतो. कॅनडातील 24 व्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेत सादर केलेल्या क्लिनिकल अभ्यासात असा दावा करण्यात आलाय. या दाव्यानुसार, अनसेफ सेक्सनंतर संबंधानंतर डॉक्सीसाइक्लिन नावाचं Antibiotic घेतल्यास sexual transmission disease धोका कमी करू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डॉक्सीसाइक्लिन या अंटीबायोटीकने पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये गोनोरिया आणि क्लॅमिडीया सारख्या STD होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून अधिक कमी केली. अंटीबायोटीक सिफिलीस विरूद्ध यशस्वी दिसून आलं परंतु निर्णायक परिणाम देण्यासाठी पुरेशी प्रकरणं नव्हती.


हा अभ्यास 500 लोकांवर करण्यात आला होता, ज्यात मुख्यतः समलिंगी पुरुष तसंच ट्रान्सजेंडर महिला आणि इतर व्यक्ती होते. या अभ्यासात सहभागी होण्यासाठी, सहभागींना गोनोरिया, क्लॅमिडीया किंवा सिफिलीस यांचं निदान झालेलं गरजेचं होतं. दरम्यान, गटातील काही एचआयव्ही प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस गोळ्या घेत होते, तर काही एचआयव्हीसह जगत होते.


यामध्ये दोन-तृतीयांशांना डॉक्सीसाइक्लिन अँटीबायोटिकच्या 200 मिलीग्राम गोळ्या दिल्या. तर बाकींना त्या देण्यात आल्या नाही. सहभागींना त्यांच्या किती लैंगिक क्रियाकलापांवर अवलंबून, आवश्यक तितक्या गोळ्या घेण्यास सांगितलं.


या अभ्यासाच्या अखेरीस असं आढळून आलं की, टीबायोटीक घेतल्याने एचआयव्ही असलेल्या गटामध्ये एसटीडीचं प्रमाण 62 टक्के आणि एचआयव्ही प्रीईपी असलेल्या गटात 66 टक्के कमी झालेलं दिसून आलं.