मुंबई : देशात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अशातच इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने सेरो सर्व्हे केला आहे. या सेरो सर्व्हेच्या माध्यमातून देशातील 67.6 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीएमआरने नुकताच चौथा सेरो सर्व्हे केला होता. या सेरो सर्व्हेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष मंगळवारी जाहीर करण्यात आले. जून आणि जुलै या महिन्यांच्या दरम्यान हे सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडीज आढळून आल्याचं समोर आलंय. दरम्यान सुमारे 40 कोटी नागरिकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळले नसून या लोकांना मात्र कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कायम असल्याचं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे.


आयसीआरच्या चौथ्या सेरो सर्व्हेमध्ये 6 ते 17 वयोगटातील मुलांचा देखील समावेश करण्यात आलेला होता. दरम्यान या सर्व्हेतून आरोग्य क्षेत्रातील 85 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली आहेत. चौथ्या टप्प्यातील या सेरो सर्वेक्षणात 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांत समावेश करण्यात आले असून, आधीची तीन सर्वेक्षणंही याच ठिकाणी करण्यात आली होती. 


  • पहिला सेरो सर्व्हे : 0.7 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

  • दुसरा सेरो सर्व्हे : 7.1 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

  • तिसरा सेरो सर्व्हे : 24.1 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

  • चौथा सेरो सर्व्हे : 67.6 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज