मुंबई : जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीला त्याची जाणीव करून देणं देखील तितकचं महत्त्वाचं असतं. नात्यात संवाद खूप महत्वाचा असतो. संवाद कमी झाल्याने वाद  वाढण्याची शक्यता जास्त असते. जर संवाद असेल तर प्रेम अजूनच फुलत जातं. काही लोकांना आपल्या जोडीदाराच्या चांगल्या गोष्टी उघडपणे सांगणं आवडत नाही किंवा ते त्यांच्या स्वभावात नसतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जर तु्म्ही ही गोष्ट हलक्यात घेत असाल तर थांबा,याबाबत आपण गंभीर असणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही  जोडीदाराची कधीच प्रशंसा करत नसाल तर तुमच्यातील संबंध बिघडू शकतात. अशा परिस्थितीत काही सोपे मार्ग निवडून तुम्ही तुमचं नात आणखीन घट्ट करु शकता.


पार्टनरला समजून घेण्याचा प्रयत्न करा 
बर्‍याच वेळा लोक त्यांच्या जोडीदारातील दोष शोधण्यात इतके व्यस्त होऊन जातात. ज्यामुळे त्यांना आपल्या पार्टनरमधील चांगल्या गोष्टी दिसत नाहीत. परिपूर्ण असं नातं तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या जोडीच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं असतं. जोडीदाराची चूक झाल्यास त्याला सतत टोमणे मारत असाल, आणि त्याचं कौतुक करणं टाळतं असाल तर ते आताच थांबवा, कारण त्याने तुमचे संबंध आणखीनंच खराब होऊ शकतात.


तुम्हाला अभिमान आहे हे खुलून सांगा
आपल्या पार्टनरने केलेल्या चांगल्या गोष्टीचं कौतुक केल्याने त्याला प्रोत्साहन मिळते. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरचा अभिमान वाटत असेल तर त्यांना खुलून सांगा. एखादी भेटवस्तू देऊन त्याचं कौतुक करा. तुमचं हे पाऊल तुमच्या पार्टनरला आनंद तर देईलच, पण त्याचा आत्मविश्वास देखील वाढवेल.



तू माझं आयुष्य बदललंस
हे अगदी खरं आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही नातं जोडता, तेव्हा तुमच्या जीवनात अनेक गोष्टी बदलतात.आपण बर्‍याच नवीन गोष्टी समजून घेतो आणि शिकतो. यात आपल्या जोडीदाराच्या योगदानाचाही तितकाच समावेश असतो. अशा परिस्थितीत, आपल्या जोडीदारास तो आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे , हे सांगण महत्त्वाचं आहे.
हे जाणून घेतल्यानंतर, जोडीदाराला फक्त आनंदच होणार नाही ,तर त्याच्या असण्याचा पॉझिटीव्ह रित्या होणारा प्रभाव पाहून तुमच्यावरचं प्रेम देखील आणखीनच वाढेल.


बाह्य सौदर्यांसह आंतरिक सौदर्य ही महत्त्वाचं 
बाह्य सौदर्यांसह आंतरिक सौदर्य ही तितकचं महत्त्वाचं आहे. लोकांना नेहमीच ते कसे दिसतात हे जाणून घ्यायला आवडतं  रिलेशनशीपमध्ये असताना जोडीदाराच्या तोंडून कौतुक ऐकायला ही अनेकांना आवडतं. कौतुक करणं हे गरजेच देखील आहे. आपल्या जोडीदाराला सांगा की तु्म्ही त्यांच्यावर किती प्रेम करता.