मुंबई : रताळ हे उपवासाच्या दिवसामध्ये प्रामुख्याने खाल्लं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीपेक्षा हटके  उपवासाचे पदार्थ आज बाजारात उपलब्ध आहेत. 'फ्राईज' पाश्चात्य वाटत असला तरीही आपल्याकडेही उपवासाला बटाट्याचे काप केले जातात. पण बटाट्यापेक्षा रताळं अधिक फायदेशीर आहे का ? 


बटाटा आणि रताळ्यामधील पोषकघटक 


बटाट्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी घटक मुबलक असतात. तर रताळ्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए घटक मुबलक असतात. 


एका वाफवलेल्या बटाट्यामध्ये दिवसभराला आवश्यक असतील इतके व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे बटाटा खाणं फायदेशीर आहे. 


तळकट पदार्थ टाळा -


रताळ आणि बटाटा या दोन्हीमध्ये आरोग्याला आवश्यक घटक असतील तरीही ते कोणत्या प्रकारे शिजवले जातात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. फ्राईज हा अगदीच तेलकट पदार्थ आहे. एका सर्व्हिंगमधून तुम्हांला ३०० कॅलरीज मिळतात. त्यामुळे तळकटपेक्षा बेक्ड स्वरूपातील पदार्थ निवडा.