निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक औषधे नेहमी फायद्याची ठरतात. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आयुर्वेदिक औषधांचा दुष्परिणाम होत नाही. पृथ्वीवर अशा अनेक आयुर्वेदिक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आरोग्यासाठी फायद्याच्या आहेत. यामधील अश्वगंधा एक आहे. शारीरिक आणि मानसिक समस्यांवरही गुणकारी आहे. बाजारामध्ये बोटभर लांबीच्या कमी जाडीच्या पांढऱ्या कांड्यांना अश्वगंधा म्हणतात. घोड्याच्या मुत्राप्रमाणे त्याच वास येतो म्हणून त्याचं नाव अश्वगंधा असं नाव पडल्याचं बोललं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त तणाव- प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तणाव असतो. या त्रासामुळे आपल्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अश्वगंधाच्या सेवनाने चिंता आणि तणाव कमी होतो. त्यासोबतच नैराश्याविरूद्ध लढायला मदत होते. 


पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवते- अश्वगंधाच्या सेवनामुळे लैंगिक जीवन सुधारण्यास मदत मिळते. लैंगिक दुर्बलतेसाठी तणाव मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे बोललं जातं. मात्र अश्वगंधाच्या सेवनाने पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता आणि टेस्टोस्टेरॉन वाढते.
खेळाडूंनाही होतो फायदा- अश्वगंधाच्या सेवनाने शारीरिक शक्ती आणि ऊर्जा वाढते. जी अनेक खेळाडूंसाठी खूप महत्वाची असते. 


केसांसाठी फायदेशीर- वयाच्या 30 व्या वर्षी आसपास असणारे बहुतांश जण पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधेचं नियमित सेवन केल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.