मुंबई : तुम्ही सहजच जमिनीवर बसत असाल... उठत असाल... पण, असाच सहजपणा पन्नाशीनंतर मात्र तुम्हाला टाळावाच लागेल... अर्थात आपल्या गुडघ्यांची तुम्ही काळजी करत असाल तर... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमिनीवर बसल्यानंतर पुन्हा उठून उभं राहण्यासाठी गुडघ्यावर अतिरिक्त दबाव पडतो. ज्या व्यक्तींना गुडघ्याच्या तक्रारी आहेत त्यांनी वज्रासनासारखे आसनंही टाळायला हवीत. 


उल्लेखनीय म्हणजे, देशात प्रत्येक वर्षी जवळपास १,७५,००० गुडघे प्रत्यारोपन होत आहेत... गुडघ्यांची काळजी घेणं टाळलं तर लवकरच हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे... आणि त्यात तुमचाही समावेश असू शकतो. 


नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन 'आयकॉन २०१७'मध्ये हाड तज्ज्ञांनी ही गोष्ट सांगितलीय. गुडघे चांगले ठेवायचे असतील तर आत्तापासूनच सायकलिंग, चालणं असे व्यायाम करायला हवेत. यामुळे गुडघ्यांच्या जवळपासच्या मांसपेशी मजबूत होतात.