मुंबई : चेहरा स्वच्छ करणे सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कारण आजकालच्या धूळ, प्रदूषणामुळे त्वचा लवकर खराब होते. इतकंच नाही तर त्वचेचा तजेला निघून जावू लागतो. म्हणून चेहरा नियमित स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. पण चेहरा धुताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. चेहरा धुताना हा चुका करता का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. काही लोक गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुतात. पण त्वचेसाठी ते चांगले नाही. गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा लवकर खराब होण्याची शक्यता असते. गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी होते. इतकंच नाही तर सुरकुत्या पडू लागतात. म्हणून चेहरा नेहमी कोमट किंवा थंड पाण्याने धुवा.


#2. चेहऱ्याला साबण लावत असाल तर तुम्ही चूक करताय. साबणामुळे त्वचा जाड, रुक्ष होते. त्वचेवर निस्तेजपणा जाणवतो. म्हणून त्वचेच्या पोतानुसार फेसवॉशची निवड करा आणि त्याने चेहरा धुवा.


#3. अजून एक चुकीची सवय म्हणजे झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे. कारण दिवसभराची धूळ, माती चेहऱ्यावर जमा होते आणि त्वचेच्या छिद्रात बंद होते. त्यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही आणि मग निस्तेज दिसते. यामुळे वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागता. 


#4. चेहऱ्याला मालिश करताना खालच्या दिशेने करणे. चेहरा धुताना, स्क्रब किवा क्रिम लावताना त्वचेला वरच्या दिशेने मालिश करा. खालच्या दिशेने मसाज केल्याने त्वचा खाली ओघळू लागते.


#5. आठवड्यातून एकदा स्क्रब जरुर करा. यामुळे मृत पेशी निघून जातात. त्वचेचा पोत सुधारतो. चेहरा उजळ दिसतो.


#6. चेहरा धुतल्यानंतर पुसताना जोरजोरात पुसता का? आता पुन्हा अशी चूक करु नका. जोरजोरात रगडून चेहरा पुसण्यापेक्षा हलक्या हाताने चेहऱ्यावर टॉवेलने टॅब करत चेहरा पुसा. त्वचा नाजूक असते. ती जोरजोरात रगडल्याने खराब होते.