मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की सुट्ट्या, मज्जा मस्तीचे दिवस सुरू होतात. पण वाढत्या उन्हामुळे डीहायड्रेशन, घामोळे, पिंपल्स, त्वचाविकारदेखील वाढतात. यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसात सतत येणारा घाम, वातावरणातील प्रदुषण, धूळ,धूर यामुळे त्वचेवर खाज येणं, रॅशेस येणं या समस्या सहाजिकच वाढतात. त्यामुळे उन्हाळ्यात हमखास तुम्हांला घामोळ्यांचा त्रास होत असेल तर या आयुर्वेदीक उपायांनी घामोळ्यांना दूर करा.  


कोरफड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरफड आणि काकडी हे नैसर्गिकरित्या थंडगार असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील घामोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी कोरफड  आणि काकडीची पेस्ट करा. हे मिश्रण त्वचेवर लावल्यास खाज येण्याची समस्या कामी होते. 20 मिनिटांनी हे मिश्रण  साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. 


कडूलिंब - 


कडूलिंबाच्या पानांची पेस्ट घामोळ्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. कडूलिंबाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. सोबतच ते अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दाह आणि खाज  कमी करण्यासाठी मदत करते. घामोळ्यांवर कडूलिंबाच्या पानांची पेस्ट लावा कालांतराने हात स्वच्छ करा.  


चंदन - 


चंदन आणि गुलाबपाणी हे दोन्ही थंड स्वरूपाचं असल्याने शरीरात नैसर्गिकरित्या थंडावा निर्माण होण्यास मदत होते. या पेस्टमुळे उन्हाळयातील घामोळ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. चंदन आणि गुलाबपाण्याला सुगंध असल्याने घामामुळे येणारा वासही कमी होतो.