Baby Born : केवळ रक्ताच्या थेंबातून किंवा त्वचेच्या पेशीतून मूल जन्माला येऊ शकतं, असं कुणी म्हटलं तर ते काल्पनिक वाटू शकतं. मात्र थांबा.. जपानमध्ये एक असं संशोधन यशस्वी झालंय ज्यातून केवळ त्वचेच्या पेशीतून प्रजोत्पादनाची प्रक्रिया पार पडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे स्त्री-बीज आणि शुक्राणूंशिवायच प्रजननाची प्रक्रिया पार पडली आहे. जपानच्या रिप्रोडक्टीव्ह बायोलॉजिस्ट लॅबमध्ये उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला आणि त्यातून काय संशोधन समोर आलं त्यावर नजर टाकूयात


त्वचा पेशीतून मूल जन्मणार? 


  • नर उंदराच्या शेपटीतील स्किन सेल्स घेण्यात आल्या

  • मादी उंदराच्या स्टेम सेल्ससोबत रिप्रोग्रॅम करण्यात आलं

  • स्टेम सेल्सला एग सेल्समध्ये परिवर्तीत करुन फर्टिलाईज करण्यात आलं

  • त्यानंतर बिजाचं मादी उंदराच्या गर्भाशयात रोपण केलं

  • यातून 10 पिल्लं जन्माला आली

  • या तंत्रज्ञानाला इन-व्हिट्रो-गेमीटोजेनेसीस असं म्हटलं गेलं

  • 'आयव्हीएफ'प्रणालीपेक्षा ते आधुनिक आहे

  • प्रजनन प्रक्रियेत सामील न होणा-या पेशींपासून उंदरांचा जन्म झाला



जपानच्या प्रयोगशाळांमध्ये उंदरांवर हा प्रयोग यशस्वी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात त्यातही अनेक अडचणी आल्या. त्यामुळे हा दावा संशोधनाच्या पातळीवर आहे. माणसांच्याबाबतही प्रजननपेशी, शुक्राणू आणि स्त्रीबीजाशिवाय प्रजनन शक्य होऊ शकतं, याबाबत पुढच्या काही वर्षात संशोधन समोर येऊ शकतं. सध्या तरी मानवी पेशींबाबत असं कोणतंही संशोधन सुरु नाही.