Banana Healthy Diet: करीनाच्या डायटीशियन सांगितले केळी खाण्याचे फायदे
केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित हवेत...
मुंबई : केळी ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळांपैकी एक आहे. अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात केळीचा समावेश कसा करता येईल याविषयी सांगितले. आपल्या मुख्य जेवणाला उशीर झाला, तर आपण वर्कआउटच्या आधी आणि नंतर मिनी मील म्हणून सकाळी सर्वप्रथम केळी खावे असा सल्ला त्यांनी दिला.
आपल्या मुख्य जेवणामध्ये केळीचा (केळीच्या फुलांची भाजी), भाकरी (केळीच्या पिठापासून बनवलेली) आणि इतर अनेक प्रकार म्हणून आपण आपल्या मुख्य जेवणामध्ये समावेश करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. या उन्हाळ्यात आपण केळ्याचा प्रभावीपणे कसा उपयोग करू शकतो. याविषयी आपल्याला आजी-ताई सांगत असतात. उन्हाळ्यात आपल्या आहारात केळीचा समावेश करण्याचे 5 मार्ग सांगितले आहेत.
केळी ही कमी-आम्लयुक्त आणि आदर्श फळ आहे जे आपण दिवसाच्या सुरूवातीला खाऊ शकतो. अन्नपचन आणि मायग्रेनपासून आपले संरक्षणही करते. पायात होणारी वेदना देखील टाळते.
हायपोथायरॉई डीझम शरीराची एक स्थिती असते. जेव्हा शरीरात थायरॉईड हॉर्मोन तयार होत नाही.
केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीरात दिवसभर स्फूर्ती राहते हे सिद्ध आले आहे. केळ खाल्यामुळे त्वरित मूड देखील दुरुस्त करतो, ज्यामुळे ते MID-DAY म्हणून घेतले पाहिजे. यामुळे शरीरात उर्जा कायम राहते.
ऋजुताच्या मते दूध, साखर आणि ब्रेडबरोबर केळीचे मिश्रण हे पारंपरिक मील आहे. केळ्याचे सेवन केल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळतो. मुलांच्या मीलसाठी हे देखील चांगले आहे कारण ते त्वरीत पचते.
केळीमध्ये भरपूर फायबर असते, यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. तसेच, केळीमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण कमी असते, जे आतड्यांसंबंधी सिंड्रोम नियंत्रित करण्यास मदत करते.
ऋजुताच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात जेवण करणाऱ्या लोकांपैकी असाल, तर तुम्ही केळीच्या दुधाच्या शेकचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. ती सांगते की, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आणि ऑनलाइन क्लासेसच्या वर्कआउटनंतर हे एक उत्तम मील आहे.