Bappi Lahiri दीर्घ काळापासून `या` आजाराने होते ग्रस्त
मुंबईतील रुग्णालयात बप्पी दा यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : हिंदी कलाविश्वात डिस्कोवर आधारित संगीत साकारत सर्वांनात आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणारे संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचं आज निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात बप्पी दा यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान बप्पी दा यांना Obstructive Sleep Apnea याचा त्रास असल्याचं समोर आलं आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण या समस्येने त्रस्त आहे. तर जाणून घेऊया ऑब्सट्रक्टिव स्लीप एप्निया म्हणजे नेमकं काय? आणि काय आहेत याची लक्षणं
झोप आणि श्वास यांच्याशी संबंधित ही समस्या आहे. ज्यामध्ये झोपल्यानंतर व्यक्तीचा श्वास थांबतो. परिणामी व्यक्तीला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकत नाही. काही लोकांना ही समस्या सामन्य वाटते परंतु यावर उपचार करणं गरजेचं आहे.
ऑब्सट्रक्टिव स्लीप एप्नियाची लक्षणं
ब्लड प्रेशर वाढणं
सतत सुस्ती वाटणं
कोणत्याही कामात मन न लागणं
रात्री झोपेत घाम येणं
स्वभाव चिडचिडा होणं
दिवसा सतत झोप येणं
ऑब्सट्रक्टिव स्लीप एप्नियाची कारणं
स्थूलतेमुळे ही समस्या उद्भवू शकते.
काही लोकांमध्ये ही तक्रार जेनेटीकरित्याही समोर येऊ शकते.
ज्या व्यक्तींना हृदयाच्या आजाराशी संबंधीत तक्रारी आहेत अशा व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो.
या समस्येपासून कसा बचाव करावा?
दररोज नियमितपणे व्यायाम करावा
सकाळी किंवा संध्याकाळी काही काळ पायी चालणं
वजन नियंत्रणात ठेवा
रात्री झोपल्यावर पोझिशन बदलत रहा