मुंबई : बदलत्या ऋतुप्रमाणे लोकं थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करण्यावर भर देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, पाण्यात मीठ मिसळून अंघोळ केल्याने अनेक समस्या दूर होतात. अंघोळीच्या पाण्यात मीठ घातल्यास सांधेदुखीला आराम मिळतो. याशिवाय ताणतणाव देखील कमी होतो. जाणून घेऊया मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास काय फायदे मिळतात. 


इन्फेक्शन कमी होतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी मीठाचं पाणी खूप उपयुक्त आहे. वास्तविक, मिठात असलेलं खनिजं अनेक प्रकारच्या संक्रमणांपासूनही संरक्षण करतात. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील सर्व छिद्रे उघडतात आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.


सांधेदुखी कमी होते


मीठ पाण्याने सांधेदुखीचा त्रास कमी होते. आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकलं तर हाडांच्या दुखापती अशाच दूर होतात. याशिवाय जर तुमच्या पायात खूप वेदना होत असतील तर कोमट मिठाच्या पाण्याने पाय धुतल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


तणाव कमी होतो


जर तुम्हालाही अधिक ताणतणाव जाणवत असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात मीठ घालून अंघोळ करा. यामुळे ताण कमी होण्यास फायदा मिळेल. मिठाच्या पाण्यात असलेली खनिजं शरीरात शोषली जातात. त्यामुळे ताण कमी होण्यास फायदा मिळतो.