मुंबई : गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीचा सामना करतोय. कोरोनाचा धोका कमी व्हावा यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यापैकी एक सगळ्यांसमोर येत असलेला प्रश्न म्हणजे लसीचं Mixing & Matching करणं योग्य आहे. दरम्यान या संदर्भात जागतिक आरोग्य संस्थेने इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डब्ल्यूएचओच्या मुख्य सायंटीस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की, पहिल्या आणि दुसर्‍या डोसच्या रूपात वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचा वापर करणं हा एक धोकादायक ट्रेंड आहे. दरम्यान या मिश्रणामुळे काय परिणाम होतील याबद्दल कोणताही डेटा उपलब्ध नाही. मात्र आपण याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.


ऑनलाईन ब्रीफिंग दरम्यान डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, बर्‍याचदा लोक असे प्रश्न विचारत असतात की, पहिला डोस घेतल्या नंतर दुसरा डोस दुसर्‍या कंपनीची लस घेऊ शकतो का? मात्र हा धोकादायक ट्रेंड आहे. कारण आमच्याकडे लसींचं मिश्रण आणि मॅच करण्याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही. 


दरम्यान वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसांची Mixing & Matchingची ही पद्धत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याबद्दल मानली जाते. परंतु आता डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे की याक्षणी याविषयी काहीही सांगणं कठीण आहे.


सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, मिक्सिंग आणि मॅचिंगबाबत मर्यादित माहिती उपलब्ध आहे. याचा अजूनही अभ्यास केला जात आहे. कदाचित हा एक चांगला प्रयत्न असू शकेल, परंतु यावेळी आमच्याकडे केवळ अ‍ॅस्ट्रॅजेनिका लसबद्दलचा डेटा आहे. 


त्या पुढे म्हणाल्या, "जर विविध देशातील नागरिक स्वतःच हे ठरवत असतील की, दुसरा, तिसरा आणि चौथा डोस कोणी आणि कधी घेतला पाहिजे तर विचित्र परिस्थिती निर्माण होईल."