मुंबई : घराच्या साफसफाईसोबतच बेकिंग सोडा चेहऱ्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही बेकिंग सोड्याचे फेसपॅक बनवू शकता. ज्यामुळे डाग, सुरकुत्या तसेच काळेपणा दूर होईल. उन्हामध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही चेहरा कितीही झाकला असला तरी धूळ-माती, प्रदूषण आणि सूर्याच्या प्रखर किरणांचा परिणाम चेहऱ्यावर होतोच. मात्र आपल्याच किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत ज्याच्या सहाय्याने आपण चेहऱ्याचे प्रॉब्लेम दूर करु शकतो. बेकिंग सोडा घराच्या साफसफाईसोबतच चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या, काळेपणा दूर करण्यात मदत करतात. बेकिंग सोड्याचे फेसपॅक वापरुन तुम्ही चेहऱ्याचे अनेक प्रॉब्लेम दूर करतात.


असे बनवा बेकिंग सोडा फेसपॅक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. मुरुमांसाठी फेसपॅक


एक चमचा बेकिंग सोडा
एक चमचा पाणी


कृती - पाणी आणि बेकिंग सोडा एकत्र करुन पेस्ट बनवा. चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट नाकावर हळूहळू रगडा. ज्या ठिकाणी पिंपल्स, ब्लॅकहेड्स आहेत त्याठिकाणी लावा. त्यानंतर २-३ मिनिटे चेहऱ्यावर हे मिश्रण राहू द्या. साध्या पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून २-३ वेळा हा प्रयोग करा.


ओपन पोर्ससाठी फेसपॅक


एक कप पाणी
एक चमचा बेकिंग सोडा


कृती  - एक कप पाण्यात बेकिंग सोडा मिसळून घ्या. आधी चेहरा क्लिंझरने साफ करुन साध्या पाण्याने धुवून घ्या. यानंतर चेहरा बेकिंग सोड्याच्या पाण्याने धुवा. चेहरा पुसल्यानंतर मॉश्चरायझर लावा. हे टोनर आठवड्यातून कमीतकमी तीन ते चार वेळा वापरा.


चमकदार त्वचेसाठी फेसपॅक


दोन चमचे संत्र्याचा रस
बेकिंग सोडा


एका वाटीत बेकिंग सोड्यासोबत संत्र्याचा रस मिसळून पेस्ट बनवा. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर चेहऱ्याला थोडे पाणी लावून हळू हळू रगडा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवड्यातून एकदा वापरा.