मुंबई : 18 हे वय आहे जेव्हा मुलं शालेय शिक्षण पुर्ण करतात आणि महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतात. नियमांनी बांधलेल्या जगानंतर, त्यांना अचानक अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. याच वयात त्यांच्या कारकीर्दीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना महत्त्वाची वेळ असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या आधुनिक युगात मुलं आधीच त्यासाठी तयार दिसतात, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या एका आईने आपल्या मुलीला शिकवायला हव्यात, कारण या युगात जर तिने त्या गोष्टींना तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि दिनचर्येचा भाग बनवलं.


तर त्याचा नंतर भरपूर फायदा होईल. आज इंटरनेटवर सगळ्यां गोष्टींची माहिती उपलब्ध आहे. पण मुलीने चुकीचा मार्ग निवडू नये यासाठी आईची मार्गदर्शक मुलीला महत्त्वाचे असते.


खरं तर, या अशा गोष्टी आहेत ज्या सौंदर्य आणि स्वच्छतेशी संबंधित आहेत. ज्याबद्दल प्रत्येक मुलीला माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना आईकडून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी फक्त त्यांनी ऐकून सोडून देऊ नये, तर त्या आत्मसाद देखील करायला हव्या. यासाठी मुलींना ब्युटी केअरच्या अॅंगलने सर्व शिकवल्या आणि समजावून सांगितल्या पाहिजेत.


मेकअप टिप्स


ते दिवस गेले जेव्हा मुलींना मेकअपबद्दल काहीच माहित नव्हते. आता हे सर्व अगदी सामान्य झाले आहे आणि कॉलेजमध्येही मुलींना नवीन मेकअप ट्रेंडनुसार कपडे तसेच हलका मेकअप करायला आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीला काही सूचना आधीच द्याव्यात.


उदाहरणार्थ, स्वस्त मेकअप प्रोडक्स खरेदी न करणे, एक्सपायरी डेटची काळजी घेणे, त्वचेला शोभेल ते लावणे, प्रसंगानुसार बेस किंवा इतर गोष्टी निवडणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मेकअप न करताही सुंदर दिसून शकते याची जाणीव करुन देणे. 


केस काढणे आणि स्वच्छता


वॅक्सिंग, थ्रेडिंग, शेव्हिंग या काही पद्धती आहेत ज्या शरीराचे केस काढण्यास मदत करतात. मुलीला या पद्धतीबाबत सांगताना त्याची संपूर्ण माहिती द्या.


उदाहरणार्थ, वॅक्सिंगमुळे होणारी पुरळ, शेव्हिंग ब्लेड्स साफ न केल्यावर बॅक्टेरियाचा संसर्ग आणि थ्रेडिंगमुळे होणारी जळजळ. त्यांना या पद्धतींशी संबंधित स्वच्छतेचे पैलू समजावून सांगा, जेणेकरून ते संभाव्य संसर्ग टाळू शकतील. जेव्हा या पद्धती प्रायव्हेट पार्टच्या आसपास वापरल्या जातात तेव्हा याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे होते.


प्रायव्हेट भागाची स्वच्छता


प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. तिला सूती बनवलेले अंडरवियर घालण्यास प्रोत्साहित करा, जे घाम शोषून घेण्यास आणि संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करून त्वचा कोरडी ठेवण्यास मदत करते.


त्याच वेळी, ते कमी घर्षण देखील तयार करते, ज्यामुळे घर्षणामुळे होणारे पुरळ दूर राहीलं. तिला प्रायव्हेट भाग धुण्यासाठी बनवलेल्या उत्पादनांबद्दल सांगा. तथापि, या प्रकरणात प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे. मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त काळजी कशी घ्यावी हे सांगण्यास अजिबात संकोच करू नका.


केसांची निगा


कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर मुलींना नवीन हेअरस्टाइल ट्राय करायला तर आवडतेच, पण स्टायलिंगसाठी त्या अनेक प्रोडक्ट्स वापरतात. अशा परिस्थितीत त्यांना फिल्टर करणे आवश्यक आहे.


जर ते केसांना खूप नुकसान करतात, तर नंतर त्यांचे केस गळू शकतात. केमिकलवर आधारित न राहता, त्यांच्या केसांची निगा राखण्यासाठी घरगुती किंवा नैसर्गिक उत्पादनांचा समावेश करा.