मुंबई : सध्याच्या घडीला काळात लठ्ठपणा ही लोकांची मोठी समस्या आहे. फीट राहण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. अशातच काही लोकांना त्यांच्या बेली फॅटची चिंता असते. जेव्हा तुमच्या पोटावर चरबी असते तेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही व्यायाम करून पोटावरील चरबीपासून मुक्त होऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोणता व्यायाम करावा, ज्यामुळे तुमची बेली फॅट निघून जाण्यास मदत होईल. चला जाणून घेऊया.


पोटाची चरबी कमी करण्याचा व्यायाम


क्रंचेस (crunches)


पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंच हा एक अतिशय प्रभावी व्यायाम आहे. जेव्हा आपण फॅट बर्निंग व्यायामाबद्दल बोलतो तेव्हा क्रंचचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं. हे करणं देखील खूप सोपं आहे. दिवसातून 10 ते 15 वेळा हे केल्याने बेली फॅट कमी होण्यास नक्की मदत होते.


झुंबा


हा अगदी मजेदार व्यायाम आपल्या आरोग्यासाठी चमत्कार करू शकतो. झुंबा वर्कआउट हा हाय इंटेंसिटीचा व्यायाम आहे. हे रक्तातील साखरेची पातळी कमी करून आणि पोटाची चरबी लवकर कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पोटावरील चरबीपासून मुक्ती मिळवायची असेल, तर आजपासून तुमच्या दिनचर्येत याचा समावेश करा.


सायकल चालवणं


सायकलिंग हा पोटाची चरबी कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो. सायकल चालवल्याने तुमच्या मांड्या आणि कंबरेचं फॅट बर्न होतं. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज रिकाम्या पोटी सायकल चालवून पोटाची चरबी सहज कमी करू शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)