Belly Fat  - कोरोनाच्या महासंकटानंतर बहुताशं लोकं आपल्या आरोग्यासाठी खूप जागृत झाले आहेत. डाएट आणि व्यायाम करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तसंच ते घरगुती आणि हर्बल गोष्टींचा वापर जास्त प्रमाणात करत आहेत.  आजकाल लोकांवर कामाचा ताण वाढला आहे. अवेळी जेवण, तासंतास एकाच जागेवर बसून राहणं यामुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवतं आहे. त्यातच पोटाची चरबी कमी करणे हे सोपं नाही. एक वेळा वजन कमी होईल पण पोटाची चरबी कमी करणे कठीण आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला असा हर्बल चहा सांगणार आहोत, तो घेतल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. Nettle Tea या चहाचा तुम्ही जर नियमित घेतल्यास तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल. हा चहा म्हणजे वजनदार लोकांसाठी रामबाण औषधं आहे. 


नेटल टी म्हणजे आहे तरी काय?



नेटल टी ही बिच्छू बूटीच्या पानापासून तयार केली जाते. या पानांना सामान्य भाषेत बिछुआची पाने असं ही म्हणतात. ही एक आयुर्वैदिक जडीबुटी आहे. ही वनस्पती जगंलात नदी-नाल्याजवळ उगवते. नेटल टी ही आयुर्वेदिक असल्याने याचा आरोग्याला मोठा फायदा होता. हा चहा बाजारात सहज उपलब्ध आहे. 


वजन कमी करण्यासाठी फायदेशीर



नेटल टी ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या चहाचं सेवन केल्यास आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसंच आपलं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. या चहाचं सेवन नियमित केल्यास आपलं मेटाबॉलिज्मचं रेट वाढतं. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते आणि आपलं वजन कमी होतं. 


नेटल टीचे अनेक फायदे
1. टाइप-2 डायबिटीज
2. हाय बीपी
3. सांधेदुखी
4. डोकेदुखी 
5. त्वचेची पातळी सुधारते
यासारख्या अनेक समस्यांवर नेटल टी सेवनाचा फायदा होतो. 


नेटल टी कशी बनवतात?



नेटल टी ची पानं पाण्यात उकळून घ्या. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि हा चहा असाच राहू द्या. एका मिनिटानंतर हा चहा पिण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला या चहाची टेस्ट वाढवायची असेल तर यात तुम्ही मधही मिक्स करु शकता. मात्र चुकूनही साखरेचा उपयोग करु नका. 


हे नक्की करा



जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचं असेल तर नेटल टीच्या सेवनासोबतच या गोष्टी पण करा. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास नक्की फायदा होईल. रोज नियमित अर्धा तास तरी व्यायाम करा. रात्रीच्या जेवण्यानंतर काही वेळाने वॉक करा. तसंच बाहेरील जेवण, जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाऊ नका.