मुंबई : सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. अशामध्ये पोटावर चरबी वाढणं ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेतो. मात्र आम्ही जर जास्त मेहनत न घेता बेली फॅट कमी करण्याचा उपाय सांगितलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र तुमच्या दैनंदिन जीवनात अशा 3 उपयांचा वापर केल्याने मेहनत न करताही तुम्ही बेली फॅट घटवू शकता. पहा हे 3 उपाय कोणते.


कॅफेनचं सेवन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅफेनचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी हानिकारक मानलं जात असलं तरी, काही अभ्यासातून कॅफेन पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं, असं समोर आलंय. तज्ज्ञांना आढळलं की, कॅफीन चयापचय उत्तेजित करण्यास मदत करतं, ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते आणि वजनंही कमी होतं. 


गरम पाणी आणि लिंबाचा रस


बेली फॅट मुक्त होण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. चरबी कमी करण्यासोबतच कॅलरी बर्न करण्यासाठीही हे पाणी खूप उपयुक्त मानलं जातं. नियमितपणे रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन करण्याची सवय लावा.


पुरेसं पाणी प्या


दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची सवय तुमच्यासाठी फायदेशीर मानली जाते. शरीराचं एकूण वजन किंवा पोटावरील चरबी कमी करायची असेल तर भरपूर पाणी पिण्याची सवय लावणं फायदेशीर ठरतं. अभ्यासात असं समोर आलंय की, कमी कॅलरी असलेल्या डाएटचं पालन करत दिवसभरात 4-5 लिटर पाणी प्यायलं तर वजन कमी होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते.