Men Ask About Bulging Belly : Belly Fat ही आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीची समस्या आहे. तुमच्या शरीरात फॅट (Body Fat) जमा झालं की, पोटाचा घेर वाढण्यास सुरुवात होते. आणि एकदा का पोट सुटलं कपडे देखील होताना नाकीनऊ येते. याशिवाय चालल्यावर धाप लागणं, 2-3 मजले चढायचे म्हटलं तरी पोटात गोळा येतो. अयोग्य खाणाच्या वेळा आणि बैठी जीवनशैली यामुळे पोटाचा घेर वाढू लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही कधी विचार केलाय का? ज्या व्यक्तीचं पोट सुटलेलं असतं, त्याच्या मनात किती प्रश्न घर करून असतात. आज या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया, अशा व्यक्तींच्या आयुष्यात नेमके का प्रश्न येतात?


पोट सुटण्यामागे काय कारण असतं?


पोट सुटण्यामागे अनेक कारण असतात. तुमच्या शरीरात फॅट वाढले की, पोट सुटतं. याशिवाय खाण्याची अयोग्य वेळामुळे अन्नाचं पचन योग्यपद्धतीने होते नाही. अशावेळीही पोट सुटण्याची समस्या उद्भवू शकते. 


कोणत्या वयामध्ये पोट अधिक सुटतं?


तुमचं पोट सुटण्यामागे नेमकं वय नसतं. विशीतील व्यक्तींचं पोट जास्त दिसत नाही. याउलट पस्तिशी चाळीशीमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. तज्ज्ञांच्या मतानुसार, 29 ते 34 या काळात पुरुषांचं पोट सुटण्याचं प्रमाण अधिक असतं.


पोट सुटण्यासाठी धोकादायक पदार्थ कोणते आहेत?


सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ हे तुमचा पोटाचा घेर वाढवतात. यासोबतच तळलेले पदार्थ तसंच रिच डेझर्ट, गोड पदार्थ आणि फायबर कमी असलेले पदार्थांमुळे तुमच्या वजनात वाढ होऊ शकते. याशिवाय ज्या व्यक्तींना दारूचं सेवन करण्याची सवय असते, त्यांच्या पोटोचा घेरही वाढू शकतो.


भात कमी खाल्ल्याने पोट कमी सुटतं?


अनेकजणांचा असा समज आहे की, पोट कमी करायचं असेल तर भात खाणं कमी केलं पाहिजे. मात्र भात आणि चपाती हे दोन्ही पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीचं पोट सुटलेलं असतं. मुळात तुम्ही, किती आणि कधी खाता यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भातामध्ये फायबर कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात. 


कमी खाल्ल्याने पोट कमी होतं?


हा सर्व तुमच्या जीवनशैलीचा प्रश्न आहे. मुळात तुमच्या शरीराला किती कॅलरीज हव्या आहेत, त्यापेक्षा थोड्या कमी कॅलरीज तुम्ही घेतल्या की तुमचे फॅट कमी होतात. मुख्य म्हणजे, तुम्ही काय खाताय आणि किती प्रमाणात खाताय हे जास्त महत्त्वाचं आहे.