मुंबई : बरेच वेळा आपण चणे-शेंगदाणे खातो. मात्र, शेंगदाणे खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असेत. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात. शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. 


- थंडीमध्ये तुम्ही जर मुठभर शेंगदाणे खाल्लेतरी ते तुमच्यासाठी चांगलीबाब ठरते. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी भरपूर प्रमाणात मिळतात. 


- शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहेत. 


- शेंगदाणे खाण्यामुळे अनेक आजारांपासून बचाव करता येतो. आठवड्यातले काही दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो.


- शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊन ते नियंत्रणात राहते. शेंगदाण्य़ांमध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने शेंगदाणा उपयुक्त अँटीऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे. 
हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट महत्त्वाचे ठरतात.


- शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात.