उन्हाळ्यात जिऱ्याच्या पाण्याचे सेवन शरीरास उपयुक्त
उन्हाळ्यात रोज सकाळी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करणे आरोग्यास लाभदाक आहे.
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आहाराकडे तर दुर्लक्ष होतेचं, पण हवे तेवढे पाणी देखी़ल शरीराला मिळत नाही. उन्हाळ्यात रोज सकाळी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करणे आरोग्यास लाभदाक आहे. त्यामूळे पोटाचे विकार बरे होतात. जिऱ्यापासून शरीरास ऊर्जा मिळते. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही, तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे.
जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक आदींची जास्त मात्रा असते. मेक्सिको, भारत या देशांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो.
जिऱ्याचे पाणी बणवण्याची कृती
एका ग्लासात पाणी आणि २ चमचे जिरे घाला, त्यानंतर १५ ते २० मिनिटे पाणी चांगले उकळू द्या. थोडं कोमट झाल्यानंतर पाण्याचे सेवन करा. नियमित जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते. सकाळी होत असलेला उल्टीचा त्रास कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी जिरे उपयुक्त
शरीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खाल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. भाजलेले हिंग, जिरे, काळे मिठ आणि पावडर १-३ ग्रॅम समान प्रमाणात करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा दह्यासोबत घ्या. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. जिरे शरीरातील रक्ताभिसरण चांगले करते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करते.