Chiku Benefits For Weight Loss in Marathi : चुकीच्या जीनशैलीमुळे वाढते वजन ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे.  वाढत्या वजनाचा सर्वात मोठा परिणाम पोटावर दिसून येतो. पोटाची चरबी वाढू लागते. यामुळे कपडे न होणं यांसारख्या समस्यानिर्माण होत आहेत. खराब आहार आणि बैठी जीवनशैली वजन वाढण्यास कारणीभूत आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जसे की, मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक आरोग्य समस्यांना बळी पडू शकते. भारतात जास्त लोक पोटातील चरबीने त्रस्त आहेत. एकूणच, देशातील 40% महिला आणि 12% पुरुष लठ्ठ आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, 135 दशलक्षाहून अधिक लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन वाढलं की कमी कसं करावं? असा प्रश्न निर्माण होतो. सध्या बाजारात वेट लॉस करण्याचे अनेक फंडे उपलब्ध आहे. बरेच औषधं देखील बाजारात सर्रास विकले जातात. पण बऱ्याचशा औषधांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढत देखील आहे. त्याचे साईड इफेक्ट्स शरीरात दिसून येतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात चिकू या फळाचा समावेश करा.
 
चिकू खाल्ल्याने वजन कमी कसे होऊ शकते? तर पोषक तत्वांनी परिपूर्ण चिकू आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, सी, पोटॅशियम आणि फायबर आढळतात. याच्या सेवनाने इतर आजारांचा धोका कमी होतो, तसेच पोटही निरोगी राहते. चिकूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट वजन कमी करण्यास मदत करते. 


उर्जेने परिपूर्ण


चिकू हे फळ उर्जेने परिपूर्ण असते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे थकवाही दूर होतो. वजन कमी करताना आपली एनर्जी लेव्हल कमी होते. ज्यामुळे इतर कामे करताना थकवा जाणवतो. 


पचनसंस्थेसाठी फायदेशीर


चिकूमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. यामधील फायबर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि अॅसिडिटीच्या समस्यांपासून आराम देते. चिकूमधील दाहक-विरोधी गुणधर्म अन्न पचवण्यासाठी मदत करते. ज्यामुळे पोटाचे विकारांचा आपल्याला त्रास देखील होत नाही. 


रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त


चिकूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच, शिवाय इतर आजारही दूर राहतात. चिकूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवतात. शिवाय सर्दी, खोकला आणि फ्लूपासून सरंक्षण करते.