रोज एक संत्र खा ; मिळवा हे जादुई फायदे
उत्तम स्वास्थासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
मुंबई : उत्तम स्वास्थासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. संत्र हे आंबटगोड फळ. त्याच्या नियमित सेवनाने अनेक फायदे होतात. संत्र्यात व्हिटॉमिन सी, कॅल्शियम, आयोडीन, सोडीयम, फॉस्फोरस, अमिनो अॅसिड आणि व्हिटॉमिन ए यांसारखे तत्त्व असतात. या फाद्यांसाठी रोज एक संत्र खाणे ठरेल फायदेशीर...
वजन
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी संत्र्याचे सेवन फायदेशीर ठरेल. त्यातून शरीराला आवश्यक पोषकघटक मिळतील आणि तुम्ही हेव्ही खाणे टाळाल.
माऊथ अल्सर
माऊथ अल्सर किंवा तोंड येण्याच्या समस्येने अनेकजण हैराण असतात. रोज संत्र खाल्याने ही समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
कॅन्सर
अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, संत्र्याच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो. संत्र्याचे नियमित सेवन त्वचा आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका कमी करेल.
उच्च रक्तदाब
रक्तदाबाच्या समस्येवरही संत्रे फायदेशीर ठरते. संत्र्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम असते त्यामुळे रक्तदाब सुरळीत करण्यास मदत होते. रोज एका संत्र्याचे सेवन केल्याने हा त्रास दूर ठेवण्यास मदत होते.
ताप
ताप आल्यानंतरही संत्र खाणे लाभदायी ठरते. ताप आल्यानंतर तोंडाला चव राहत नाही. त्यामुळे काही खावेसे वाटत नाही. अशावेळी संत्र्याचा ज्यूस खूप फायदेशीर ठरेल.