मुंबई : वयाचा विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतर तरूणांवर 'लग्न' करण्यासाठी घरातून दबाव वाढतो. प्रामुख्याने घरातील वडीलधारी मंडळी लग्न, जबाबदारी, भविष्यातील प्लॅनिंग, संसार असा सगळाच लेखाजोखा मांडतात. पण आजकाल शिक्षण आणि अस्थिर करियरमुळे तरूणाईचा कल हा थोडा उशीरा लग्न करण्याकडे झुकलेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या घरात लवकर लग्न करण्यासाठी घरातील मंडळी घाई करत असतील तर टेन्शन घेऊ नका कारण उशीरा लग्न करण्याचेही त्याचे काही खास फायदे आहेत.  लग्न केल्याने दूर होणार ही समस्या, संशोधनात झालाय मोठा खुलासा


आर्थिकदृष्ट्या सबळ 


आजकाल तरूण मंडळी आधी आर्थिकदृष्ट्या सबळ होते आणि नंतरच लग्न करण्याचा निर्णय घेते. वर्षागणिक तुम्ही नीट प्लॅनिंग केले आर्थिकदृष्ट्या स्टेबल राहू शकता. स्वतः पैसे कमवायला लागले की ते कशावर उधळायचे याबाबतचा समजुतदारपणाही सोबतच वाढायला सुरूवात होते.  


मॅच्युरिलीटी लेव्हल  


काहींना वयानुसार नव्हे तर बदलत्या वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार मॅच्युरिटी लेव्हल, समजुतदारपणा वाढीस लागतो. त्यामुळे भविष्याबाबतचे निर्णय घेणं अधिक सुकर होते.  


स्वतःला ओळखण्याची संधी 


उशीरा लग्न करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्वतःलाच ओळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तुम्हांला स्वतःकडून आणि समोरच्याकडून काय अपेक्षा आहेत? याबाबत पुरेशी कल्पना असते. 


वयानुसार विचारांमध्ये बदल होतात 


जसजसा काळ बदलत जात जातो तसे प्रत्येकाच्या विचारांमध्ये बदल होतात. कदाचित एखाद्या गोष्टीकडे वयाच्या 20 व्या वर्षी पाहण्याचा दृष्टीकोन हा 40 व्या वर्षी वेगळा असू शकतो. वयाच्या एखाद्या विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर लोकं अनेक गोष्टींबद्दल खूप गांभीर्याने विचार करतात. 


 स्वप्नांना पुरेसा वेळ देता येतो  


 प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वप्नांचा वेध घेत असतात. उशीरा लग्न केल्याने हा वेध यशस्वीपणे सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही स्वतःलाही पुरेसा वेळ देऊ शकता. अनेकदा लग्न झाल्यानंतर 'तडजोडी' करणं भाग पडत आणि स्वप्न मागे पडतात.