मुंबई : वाढत्या वयासह केस पांढरे होणं ही सामान्य बाब आहे. परंतु आता कमी वय असणाऱ्या, अगदी लहान मुलांचेही केस पांढरे होण्याची समस्या वाढत आहे. लहान वयात केस पांढरे होणं मोठी चिंतेची बाब ठरत आहे. केस पांढरे होण्यासाठी खराब पाणी, अति ताण, अनियमित जीवनशैली आणि इतर अनेक कारणं असतात. पांढरे केस लपवण्यासाठी छोट्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण केसाला कलर करतात. केमिकलयुक्त कलरमुळे पांढरे केस लपवण्यासाठी मदत होते, पण कालांतराने याचे गंभीर परिणाम, इतर समस्या होण्याचीही शक्यता असते. मात्र केमिकल कलरशिवायही केस नैसर्गिकरित्या कलर करता येऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसांना नेसर्गिक कलर करण्यासाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर करता येऊ शकतो. आयुर्वेदात जास्वंदीचं फूल एक उत्तम औषधी फूल मानलं जातं. केसांच्या समस्येवर जास्वंदीच्या फूलाचा वापर करता येऊ शकतो. जास्वंदीची फूल आणि पानं वाटून त्या मिश्रणाचा लेप केसांवर लावल्याने केस गळणं, केसात कोंडा होणं या समस्यावर फायदा होऊ शकतो. केसांसाठीचं तेल बनवतानाही याचा वापर केला जातो.


- जास्वंदीची फूलं केसांना केवळ नैसर्गिक रंगच देत नाहीत, तर केस चमकदार होण्यासही मदत होते. केसांच्या वाढीसाठी , कोंडा कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो.


- जास्वंदीच्या फूलांचा कलर बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी गरम करा. गरम पाण्यात एक कप जास्वंदीच्या फूलांच्या पाकळ्या टाका. 15 ते 20 मिनिटांपर्यंत पाणी गरम करा. त्यानंतर पाणी थंड करुन, गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.


- स्प्रे बॉटलमधील कलर केसांना लावण्याआधी केस धुवून घ्या. त्यानंतर कंगव्याच्या मदतीने कलर संपूर्ण केसांवर लावा. एक तासापर्यंत हा कलर सुकू द्या. त्यानंतर पाण्याने केस धुवा. केसांना नैसर्गिक कलर करण्यासाठी हा चांगला उपाय ठरु शकतो.