अनेक रोगांवर गुणकारी आहे ज्येष्ठमध
चवीला गोड असलेल्या ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसरायजिक अॅसिज, अँटी-ऑक्सिंडंट, अँटी बायोटिक, प्रोटीन आणि असे अनेक गुण आहेत. याचा वापर डोळे, तोंडाचे आजार, श्वासाचे आजार, हृदयाचे आजार, जखमांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे.
मुंबई : चवीला गोड असलेल्या ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसरायजिक अॅसिज, अँटी-ऑक्सिंडंट, अँटी बायोटिक, प्रोटीन आणि असे अनेक गुण आहेत. याचा वापर डोळे, तोंडाचे आजार, श्वासाचे आजार, हृदयाचे आजार, जखमांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. कफ, पित्त आणि वात या तीन दोषांवर उपचारासाठी ज्येष्ठमध फार गुणकारी ठरते. ज्येष्ठमधाचे चूर्ण आणि बडिशेपचे चूर्ण एकत्र मिसळून दररोज संध्याकाळी खाल्ल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते.
कान तसेच नाकाचे आजार असतील तर त्यावरही ज्येष्ठमध गुणकारी आहे. ज्येष्ठमध आणि द्रांक्षामध्ये शिजवलेले दूध कानात टाकल्याने कानाचे आजार दूर होतात. तोंड आल्यास ज्येष्ठमधाच्या काड्या मध लावून चाटल्यास फायदा होतो. ज्येष्ठमधाच्या काड्या चघळल्याने खोकला आणि घशाचे आजार दूर होतात. ज्येष्ठमधाच्या काड्या चघळल्याने उचकी दूर होते.
हृदयरोगावरही ज्येष्ठमध अत्यंत फायदेशीर आहे. ज्येष्ठमधचे मुळचे चूर्ण पोटाच्या विकारांसाठी अत्यंत गुणकारी आहे. पोटात झालेली जखम त्याने लवकर भरून निघते. रक्ताची उलटी होत असेल तर दूध अथवा मधासोबत ज्येष्ठमध दिल्यास आराम पडतो. घश्यात खवखव होत असेल तर ज्येष्ठमधाचा वापर करतात. सतत उचकीचा त्रास होत असेल तर ज्येष्ठमधाचे चूर्ण मधात मिसळून नाकात टाका.