Benefits of Pani Puri In Marathi : जेव्हा कधी जिभेचे चोचले पुरवावेसे वाटले,  किंवा काही चमचमीत खावेसे वाटते तेव्हा डोळ्यासमोर पहिले नाव येते ते पाणीपुरीचे. कोणीही असो पाणीपुरीचे नाव जरी काढले की तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी देशात विविध नावांनी ओळखली जाणारी ही पाणीपुरी तुम्हाला प्रत्येक नाक्यावर अथवा चौकावर पाहायला मिळते. अनेकजण पाणीपुरी आरोग्यदायी नसल्यामुळे खाणे टाळतात. मात्र हा पूर्णत: चुकीचा समज आहे. पाणीपुरी खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठीही पाणीपुरीचा वापर करता येतो. स्वच्छतेच्या कारणास्तव बाजारात मिळणारी पाणीपुरी अनेकदा खाण्याचे टाळली जाते. मात्र त्यापेक्षा घरी आपल्याला हवी तशी पाणीपुरी बनवून आपण त्या पाणीपुरीचा आस्वाद घेतलात तर त्यातून आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. चला तर मग टेस्टी टेस्टी पाणीपुरी खाण्याचे काय फायदे आहेत? जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅसिडिटी (Acidity) – पाणीपुरीसाठी पाणी बनवण्यासाठी जिरे, काळे मीठ आणि पुदिना वापरतात. हे पाणी पोट शांत ठेवण्यास मदत करते. म्हणजेच या पाण्यामुळे ऍसिडिटीची समस्या दूर होते.


वजन कमी करणे (weight Lose ) – वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाणे फायदेशीर आहे. कारण पाण्यात मिसळलेले मसाले तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच पाणी बनवताना त्यात मिरची, लिंबू, हिंग आणि कच्चा कैरी या अवश्य गोष्टी घाला. शक्यतो गोड पाण्याचा वापर करु नका.


तोंड येणे (Mouth Ulcer) - पाणीपुरीसाठी पाणी तयार करण्यासाठी आंबट आणि तिखट मसाले वापरले जातात. हे मसाले तुम्हाला तोंड आले असेल तर त्यावरील रामबाण उपाय आहे. 


मळमळ (nausea) – काहीवेळा तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय मळमळ जाणवते किंवा चिडचिड होते. मूड बदलणे ही ही समस्या दीर्घकाळ राहते आणि मळमळ झाल्यानंतर काहीही खावेसे वाटत नाही. अशा वेळी पाणीपुरीची खूप मदत होते.  मळमळ झाल्यानंतर पाणीपुरी खाल्लाने लगेच व्यक्ती मूळ पदावर येऊ शकते. 


रक्तातील साखर नियंत्रित करणे (Controlling blood sugar)- कमी  कार्बयुक्त सामग्रीमुळे, पाणीपुरी ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली सिद्ध होऊ शकते. मात्र त्यांचे सेवन  करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 


लघवीच्या समस्येपासून सुटका: घरी बनवलेल्या पाणीपुरीच्या पाण्यात गोड कमी घालून पुदिना, जिरे, हिंग टाकल्याने पचनशक्ती मजबूत होते. पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणारी हिरवी कोथिंबीर पोटफुगी आणि लघवीची समस्या दूर करते. 


पाणीपुरी शक्यतो दुपारच्या वेळी खावी. दुपारचे जेवण आणि संध्याकाळी पाणीपुरी खाल्ल्यास खाल्लेले अन्न चांगले पचते. त्यामुळे पोटाचे इतर विकार होत नाहीत. मात्र एकावेळी 5-6 पाणीपुरींपेक्षा जास्त पुरी खाणे टाळा.


गुजरातमधील अहमदाबाद शहरात पाणीपुरीप्रेमींसाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. इथे पाणीपुरी खाण्यासाठी व्हेंडिंग मशीन आहे. किंवा मशीनच्या मदतीने तुमच्या आवडीची पाणीपुरी खाऊ शकता. व्हेंडिंग मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाईप लावले आहेत. तुम्हाला हवे असलेले पाणी गोड, तिखट किंवा मध्यम असे एका बटणावर क्लिक केल्यास तुम्हाला ते मिळेल.