थंडीत दररोज खा भिजवलेले शेंगदाणे...होतील अनेक फायदे
थंडीत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. थंडीमध्ये भूक खूप लागते. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. थंडीत शेंगदाणे खाणेही शरीरासाठी चांगले असते. गरींबाचे बदाम असे शेंगदाण्यांना म्हटले जाते. थंडीत दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
मुंबई : थंडीत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. थंडीमध्ये भूक खूप लागते. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. थंडीत शेंगदाणे खाणेही शरीरासाठी चांगले असते. गरींबाचे बदाम असे शेंगदाण्यांना म्हटले जाते. थंडीत दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
हृदयरोग होतील दूर
भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने यातील पोषकतत्वे आणि लोह रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. बीपीची समस्याही दूर होईल. दररोज शेंगदाण्याचे सेवन केल्याने हृदयरोगाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.
पाचनशक्ती सुधारते
शेंगदाण्यामुळे पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते. पोटासंबंधित आजार दूर होतात. थंडीत शरीरातील उष्णता तसेच एनर्जी वाढवण्याचे काम शेंगदाणे करतात.
सांधेदुखीचा त्रास असल्यास
शेंगदाण्यात कॅल्शियम, व्हिटामिन ए आणि प्रोटीन्स असतात. तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास असल्यास दररोज सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने फायदा होतो. यात पोटॅशियम, मँग्नीज, कॉपर, कॅल्शियम, लोह, सेलेनियम ही खनिजे असतात. तुम्हाला सांधेदुधी तसेच कंबरदुखीचा त्रास असेल तर भिजवलेले शेंगदाणे खावेत.
डोळ्यांचे आरोग्य वाढते
शेंगदाणे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते तसेच डोळ्यांचे आरोग्यही सुधारते. थंडीत शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. डायबिटीजचीही समस्या शेंगदाणे खाल्ल्याने दूर होते.