Benefits of Saying NO: अनेकदा आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जे आपल्याला अनेकदा अडचणीतही (How to Tackle Problems in Life) आणतात. अशा प्रसंगांवर मात करणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असते. काहींना अशा कठीण परिस्थितीवर मात करणं जमते तर काहींना मात्र अशा परिस्थितीत काय म्हणावं हेच समजतं नाही. परंतु तुम्हाला अशा परिस्थितीत एकच करायचे असते ते म्हणजे तुम्हाला अशा परिस्थितीतून एक सुवर्णमध्य (Golden Mean) काढायचा असतो. पण अनेकांना तो कसा काढायचा हेच समजतं नाही त्यामुळे त्यांना अशा वेळेला आणखीनं अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टीतून तुम्ही योग्य तो सुवर्णमध्य तुम्ही कसा काढू शकता ते. (Benefits of Saying NO try these tips to avoid problematic situations)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नाही म्हणायला शिकायला हवे. जर का तुम्ही हे शिकलात तर तुम्ही अर्ध काम होईल. अनेकांना नाही म्हणता येत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला होचं म्हणायची सवय लागते. यामागे त्या व्यक्तीची कारणं कुठलीही वेगळी असतील. अनेकदा त्यांना असं वाटतं की हो म्हण्यातच योग्यता आहे. परंतु प्रत्येकवेळा तसे होईलच असे नाही. कारण आपल्याला तशी सवयचं लागून गेली असते आणि त्यातून ही सवय लवकर जातही नाही. परंतु तुम्हाला नाही म्हणायची सवय (Bad Habit of Saying Yes) लावून घ्यायला हवी. 


आपल्याला अनेकदा आणि गरजेनुसार नाही म्हणणे फार आवश्यक आहे कारण जर का तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो हो करायला लागलात तर तुम्हाला तशीच सवय लागेल आणि समोरच्या माणूसही तुम्हाला गृहित धरायला लागेल आणि त्यातून भलत्याच गोष्टी होतील. पण हेही लक्षात ठेवा की, नाही म्हणायची ही पुर्ण जबाबदारीही (Responsibility) आपलीच असते. या लेखातून आम्ही तुम्हाला नाही म्हणण्याचे फायदे सांगणार आहोत आणि नाही नाही म्हण्याचे तोटेही सांगणार आहोत. 


1. लोकांच्या अपेक्षा वाढवू देऊ नका - 


आपल्या सगळ्यांचाच असा एक मानवी स्वभाव असतो की, आपण लोकांना खूप गृहितं धरतो. आपल्याला अनेकदा समोरचा माणूस हो म्हणतो म्हणजे तो पुढच्या वेळीही हो म्हणेल अशी समजूत होऊन जाते. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की, आपल्याला कोणी गृहित (Taken For Granted) धरू नये त्यामुळे वेळीच नाही म्हणायला शिका. 


2. तणाव परिस्थिती वाढू शकते - 


एक गोष्ट अशी आहे की सारखं हो म्हटलं तुम्हाला संकटात टाकू शकतं. त्यामुळे नाही म्हणायला शिका. यामुळे तुम्हाला तणावही (Stress) येऊ शकतो. तेव्हा अशा गोष्टींपासून लांब रहा. अनेक हो म्हटल्यानं तुमच्याकडून अनेक लोक नाही नाही ते काम करून घेतील. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)