मुंबई : आपण एखादी नवीन बॅग, पाण्याची बाटली किंवा नवीन शूज विकत घेतले की त्यासोबत आपल्याला ही छोटीशी पुडी किंवा पॉकेट मिळतेच. बरं त्यात नेमकं काय असतं? आणि याचा उपयोग तरी काय? हे प्रश्न अनेकांना पडतात. ‘ही छोटीशी पुडी फाडू नका’ किंवा ‘ती लहान मुलांच्या हातात देऊ नका’ अशा सूचनाही त्यावर लिहिलेल्या असतात. या पुडीत नेमके असते तरी काय? तर या पुडीत शेकडो छोटे छोटे पारदर्शक दाणे असतात. त्यास सिलिका जेल असे म्हणतात. पण ती निरुपयोगी नसून खूपच उपयोगी वस्तू आहे.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     सिलिका बॉल्स आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे रिमोट किंवा मोबाईलमध्ये पाणी गेलं असेल तर हे पाणी लगेच निघून जातं.

  • तुमच्या जीम बॅगमध्येही तुम्ही सिलिका जेल पॉकेट ठेवू शकता. जीम बॅगमध्ये घामाचे टी-शर्ट, टॉवेल असतात, त्यामुळे बॅगेला कुबट वास येतो. ही दुर्गंधी घालवण्यासाठी सिलिका जेल पॅकेट उपयुक्त ठरतं. 

  • शूजमधली दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता.

  • पावसाच्या दिवसात अनेकदा बॅग भिजते, दमट हवामानामुळे ती नीट सुकत नाही. अशावेळी बॅगमध्ये सिलिका जेल पॉकेट ठेवावं. ओलाव्यामुळे येणारी दुर्गंधी निघून जाते.

  • तुमच्या फोटो बुक किंवा फोटो अल्बमच्या बॅगमध्येही तुम्ही हे छोटे पॉकेट आवर्जून ठेवा. वर्षभरानंतर अल्बमवर दमट हवेमुळे बुरशी चढते. अल्बमची पानं एकमेकांना चिकटतात. अल्बमचं नुकसान टाळण्यासाठी आणि अल्बम दीर्घकाळ टिकवण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता.

  • पुस्तकं जुनी झाली की त्यांना देखील कुबट वास येऊ लागतो. तेव्हा तुमच्या पुस्तकाच्या कपाटात हे पॉकेट ठेवणं जास्त फायदेशीर ठरतं.