Weight Loss साठी चपातीपेक्षा `हे` पर्यायी पदार्थ फायद्याचे; `या` 5 पिठांचा करा असा वापर
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी चपातीला डच्चू देऊन खाऊन पाहा `हे` पर्यायी पदार्थ; 5 पिठांचा करा असा वापर
Flour Options For Weight Loss : बदलत्या जीवनशैलीमुळं अनेकदा आरोग्यावर त्याचे परिणाम दिसू लागतात आणि काही चुकीच्या सवयींमुळं शरीरावर नेमके कसे आणि किती अनिष्ठ परिणाम होत आहेत याचा अंदाज येऊ लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईमध्ये स्थुलतेची वाढती समस्या याच बदलचाला एक नकारात्मक परिणाम आहे. यावर मात करण्यासाठी म्हणून अनेक मंडळी त्यांच्या परिनं आहाराच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्याच्या प्रयत्नांत आहेत , पण त्यातही त्यांना अपयश मिळत आहे. यामध्ये काही लगानशा चुका कारण ठरतायत याचा अंदाज येतोय का?
अनेकदा वजन कमी करण्यासाठी किंवा ते नियंत्रणात ठेवण्यासाठी काही मंडळी आहारातून काही गोष्टी बाद करतात आणि अमुक गोष्टींवरच अधिक भर देतात. पण, अनावधानानं तज्ज्ञांच्या सल्ल्याअभावी इथंच अधित चुका होतात. याचं एक उदाहरण म्हणजे जेवणात पोळी, चपाती, भाकरीसाठी वापरलं जाणारं धान्याचं पीठ.
पिठाचा नेमका कसा परिणाम होतो?
तुम्ही ज्या पिठाचा वापर करून पोळी किंवा भाकरी बनवता त्याचा परिणाम शरीरातील चरबीवर होत असतो. सहसा अनेक घरांमध्ये पोळी/ चपातीसाछी गव्हाच्या पिठाचा वापर केला जात. पण, वजन कमी करण्यासाठी मात्र त्याचा फारसा फायदा होत नाही. अशा वेळी खालील पर्याय तुमची मदत करू शकतात.
जवसाचं पीठ
जवसाच्या पिठामध्ये तंतुमय घटकांचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळं जवसाची भाकर बराच वेळ पोट भरल्याची जाणीव करून देते. जवसामध्ये बीटा ग्लुकॉन असल्यामुळं रक्तातील सारखेरंच प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याची मदत होते.
बेसन
बेसन किंवा चणाडाळीच्या पिठामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. यामुळं मांसपेशी अधिक सक्षम होऊन वजन घटण्यास मदत होते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मोडत असल्यामुळं बेसनाच्या सेवनानं रक्तातील साखर नियंत्रित राहते. बेसनचा चिला, त्यामध्ये विविध भाज्या आणि मसाले मिसळून तो तयार केल्यास शरीराला मुबलक प्रमाणात अन्नपुरववठा होतो. बेसनचा चिला पोळीचा पर्याय म्हणून उत्तम आहे.
मुगडाळीचं पीठ
मुगडाळीचं अथवा सालभरल्या मुगाचं पीठही शरीरासाठी उत्तम. मुगाच्याडाळीचा चिला चपातीची जागा घेऊन शरीराला अनेक पोषक घटक पुरवतो. चवीसाठी मुगाच्या डाळीच्या पिठात तुम्ही अळशीचे दाणेही मिसळू शकता किंवा अळशी आणि मुगाचं पिठ समप्रमाणात घेऊनही चिला अथवा डोसा बनवू शकता.
बाजरीचं पीठ
बाजरीमध्ये मॅग्निशियम आणि फॉस्फोरस अधिक प्रमाणात असल्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात चरबी कमी करण्यासाठी बाजरीतील घटक हातभार लावतात असं आहारतज्ज्ञांचं मत. त्यामुळं बाजरीच्या पिठाचं थालीपीठ किंवा धपाटे चपातीचा पर्याय म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. बाजरीची भाकर यामध्ये सर्वात उत्तम.
ज्वारी आणि मक्याचं पीठ
ज्वारीच्या पिठात तंतुमय घटकांसमवेत प्रोटीनचंही जास्त प्रमाण असतं. ज्यामुळं पोट भरलेलं राहतं. ज्वारी ग्लुटन फ्री असल्यामुळं ज्यांना ग्लुटनची अॅलर्जी आहे अशा मंडळींसाठी ज्वारीची भाकरी, थालीपीठ किंवा घावन उत्तम पर्याय आहेत.
हेसुद्धा वाचा : Mumbai News : 'बेस्ट'चा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागणार; आर्थिक कोंडीचा प्रवाशांना फटका
वरील पिठांचा वापर करून भाकरीसोबतच चिला, घावन, धालीपीठ, धपाटे किंवा अगदी पॅनकेक रुपातील पदार्थ तुम्ही बनवू शकता. पोट भरण्यासोबतच हे पदार्थ शरीरासाठीही पूरक असतील. वजन कमी करण्यासाठी वरील पिठं कितीही फायद्याची असली तरीही आहारसमवेत योग्य व्यायाम आणि जीवनशैलीतील काही सकारात्मक बदल यांचीही जोड तितकीच महत्त्वाची हे विसरून चालणार नाही!
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खारजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )