High Cholesterol कमी करायचा असेल तर `या` 5 कुकिंग तेलामध्ये अन्न शिजवा
तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड भारतात सर्वाधिक आहे. यामुळे लोकांच्या रक्तात उच्च कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते.
Best Cooking Oil For Body: भारतात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी पाहायला मिळते. राज्य बदललं की पदार्थ बदलतात आणि चव देखील वेगळी असते. असं असलं तरी तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड भारतात सर्वाधिक आहे. भाज्या, भजी, चिप्स, फास्ट फूडपासून ते मांसाहारी पदार्थ तयार करताना तेलाचा प्रचंड वापर केला जातो. त्यामुळे लोकांच्या रक्तात उच्च कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल वेसल डिसीज, डायबिटीज यांसारखे गंभीर आजार होण्याची भीती असते. तेलकट अन्न आपल्या रक्तातील लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) ची पातळी हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) पेक्षा जास्त वाढवते. त्यामुळे प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता असते.
सॅच्युरेटेड फॅट खराब कोलेस्ट्रॉल वाढवते
बाजारात अनेक कंपन्या तेल आरोग्यदायी असल्याचा दावा करतात. पण असं असलं तरी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात. याचे कारण म्हणजे या तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळते. हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी अनसॅच्युरेटेड फॅट हा उत्तम पर्याय आहे. या तेलांच्या सेवनाने लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) चे प्रमाण कमी करता येते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे तेल वापरा
भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ 'निखिल वत्स' यांनी सांगितले की, अनसॅच्युरेटेड फॅट असलेले तेल वापरलं पाहीजे. हे तेल आरोग्यदायी पर्याय मानले जाऊ शकते. कोणते तेल वापरले पाहीजे जाणून घेऊयात.
1. ऑलिव्ह ऑइल
2. सूर्यफूल तेल
3. कॉर्न ऑइल
4. पांढरे मोहरी तेल
5. शेंगदाण्याचं तेल
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे इतर मार्ग
अधिकाधिक फायबरयुक्त पदार्थ खा.
जंक आणि फास्ट फूड खाणे टाळा.
दररोज व्यायाम करा.
अधिकाधिक बीटा ग्लुकन पदार्थ खा.
दारू पिण्याचे व्यसन सोडा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. उपचार अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)