Tips to Keep Dry Lips Moist News In Marathi: हिवाळ्याच्या दिवसात हवा खूप थंड असते. परिणामी कोरड्या हवेमुळे त्वचाही कोरडी होते. तसेच ओठही कोरडे होतात. या काळात बहुतेकांना ओठ फुटण्याची समस्या असते. अशावेळी काही लोकांना फाटलेल्या ओठांमधून रक्त सुद्धा येते. यामुळे त्रास तर होतोच पण यामुशे सौंदर्यही बिघडते. जर तुम्ही पण फुटलेल्या ओठांपासून त्रस्त असाल तर तुम्ही काही घरगुती उपाय अवलंबू शकता. यावर अवलंबून करुन तुम्ही ओठ सॉफ्ट कर शकता. 


नाभीत तेल टाकणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात, त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना तेल लावा. नाभी हे आपल्या शरीराचे केंद्र मानले जाते, त्यात तेल लावल्याने अनेक समस्या दूर होतात. रोज तेल लावल्याने ओठ मऊ आणि गुलाबी होतात.


ओठांवर मलाई लावा


जर तुम्हाला ओठ फुटण्याचा त्रास होत असेल तर दररोज ओठांवर मलाई आणि हळद लावा. एका चमच्याने क्रीम घेऊन त्या चिमूटभर हळद मिसळून लावल्याने ओठ तजकण्याची समस्या दूर होईल. 


ओठांवर तूप लावा


जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसे ओठ कोरडे होऊ लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी ओठांवर तूप लावू शकता. तूपामुळे ओठांना मॉइश्चरायझ करेल, तसेच त्वचेला ग्लो आणेल. 


गुलाबाची पाने कोरडेपणा दूर करतात


हिवाळ्यात ओठ कोरडे वाटत असतील तर ओठांवर ओलावा आणण्यासाठी गुलाबाची पाने वापरा. गुलाबाची पाने पाण्यात भिजवून रोज ओठांवर लावा, तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होतील.


भरपूर पाणी प्या


हिवाळ्यात पिण्याचे पाणी कमी पिल्याने ही ओठांचा कोरडेपणा वाढतो. ज्यामुळे ओठ कोरडे होतात आणि फाटतात. हिवाळ्यात किमान एक ते दोन लिटर पाणी प्या. जास्त पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.


फुटलेल्या ओठांवर पांढरे लोणी लावा


रात्री झोपण्यापूर्वी कोरड्या ओठांवर  पांढरे लोणी लावा.  पांढरे लोणी लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते आणि ओठ गुलाबी आणि मऊ राहतात.


बदामाचे तेल


कोरड्या ओठांना पुनरुज्जीवित करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल लावा. बदामाचे तेल अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी भरलेले असते. ओठ मऊ करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.


 


 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)