Cough Syrup : लहान मुलांना कफ सिरप (Cough Syrup) देताय तर सावधान. कारण मुंबईत कप सिरप प्यायल्यानंतर एका दीड वर्षांच्या मुलाचे ह्रदयाचे ठोके बंद पडले. तब्बल 20 मिनिटांपर्यंत लहान बाळाच्या ह्रदयाचे ठोके बंद होते. 20 महिन्यांच्या या लहान मुलाला सर्दी आणि ताप आला त्यामुळे त्याच्या आईनं डॉक्टरांना न विचारताच त्याला एक कप सिरप दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कप सिरप प्यायल्यानंतर 20 मिनिटातच हा मुलगा अचानक खाली पडला आणि त्याच्या ह्रदयाचे ठोके बंद पडले. इतंकच नाही तर हा चिमुरडा श्वासही घेऊ शकत नव्हता. घाबरलेल्या कुटुंबानं तातडीनं बाळला सीपीआर दिलं आणि त्यामुळे मुलगा वाचला. त्यामुळे लहान मुलाला कप सिरप देताना सतर्क राहा.



लहान मुलांसाठी कफ सिरप घातक? 


  • 6 वर्षापेक्षा लहान मुलांना कोडीन असणारी कफ सिरप जास्त वेळा दिली तर ते आरोग्यासाठी घातक असतं

  • कोडीनयुक्त कफ सिरपमधील अँटीहिस्टामाईन लहान मुलांसाठी घातक ठरु शकतं

  • कोडीनयुक्त सिरपमुळे लहान मुलांचे हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. 

  • कोडीनयुक्त सिरपमुळे बाळांना सुस्ती येऊ शकते. 

  • कोडीन केमिकल अफीमशी संबंधित असतं

  • कोडीनच्या अतिसेवनामुळे डिप्रेशन, झोप न येणं, भूक न लागणं, पोटदुखी असे त्रास होऊ शकतात


सध्या थंडीमुळे सर्दी, खोकल्याची साथ आहे. लहान मुलांनाही याचा फटका बसतोय. सर्दी, खोकल्यापासून वाचण्यासाठी कफ सिरप सर्रासपणे दिलं जातं. पण हेच कफ सिरप चिमुरड्यांच्या जिवावर बेतू शकतं. त्यामुळे कफ सिरप देताना सावधान.